औरंगाबादचे वैष्णव फिडे आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:08 AM2018-01-18T01:08:38+5:302018-01-18T01:08:54+5:30
मुंबई येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे (फिडे) आंतरराष्ट्रीय फिडे पंच परीक्षेत औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित वैष्णव उत्तीर्ण झाले आहेत.
औरंगाबाद : मुंबई येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे (फिडे) आंतरराष्ट्रीय फिडे पंच परीक्षेत औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित वैष्णव उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई येथे झालेली फिडे पंच परीक्षा आंतरराष्ट्रीय पंच आर. अनंथराम, तसेच आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणावी यांनी घेतली. या परीक्षेत देशभरातून ३६ जण सहभागी झाले होते. त्यापैकी २५ जण उत्तीर्ण झाले. अभिजित वैष्णव यांनी जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार ३ नॉर्म पूर्ण केल्याबद्दल त्यांना आरबिटर ही पदवी बहाल करण्यात येणार आहे. अभिजित वैष्णव हे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळ खेळावर पीएच.डी. करीत आहेत. त्यांना एमसीएचे कार्यकारी अध्यक्ष विजय देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल एमसीएचे सहसचिव शोभराज खोंडे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे, सचिव हेमेंद्र पटेल, डॉ. संजय मोरे, प्रा. रवींद्र बनसोड, अमरीश जोशी, विलास राजपूत, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, संजय वणवे, सचिन पुरी, विलास राजपूत, मिथुन वाघमारे, पुष्कर वैद्य आदींनी त्यांचे अभिनंदन केले.