कर्जबाजारीपणाला कंटाळून वैजापूरच्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:04 PM2018-04-03T20:04:09+5:302018-04-03T20:05:10+5:30
तालुक्यातील डाग पींपळगाव येथील बाळकृष्ण ठकाजी डांगे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळुन शनिवारी विषारी द्रव्य प्राशन केले होते. आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वैजापूर (औरंगाबाद ): तालुक्यातील डाग पींपळगाव येथील बाळकृष्ण ठकाजी डांगे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळुन शनिवारी विषारी द्रव्य प्राशन केले होते. आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
डांगे यांच्यावर शेती व पीक कर्जासाठी विविध बॅंकेतुन घेतलेले साडेचार लाख रुपयांचे कर्ज होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि ते फेडणे अशक्य झाल्याने त्यांनी शनिवार ( दि.३१) रोजी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांच्यावर तिन दिवसापासून वैजापुर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली, सुन असा परिवार आहे. कर्जामुळे आणि त्याच्या परतफेडीसाठीच्या तगाद्यामुळेच डांगे यांनी टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा परिसरात होती.