व्वा..! ताशी १०० कि.मी.च्या गतीने धावली ‘वंदे भारत’; उद्यापासून मुंबईसाठी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 05:41 AM2023-12-29T05:41:48+5:302023-12-29T05:42:59+5:30
ट्रायल रन यशस्वी.
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारी मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. मनमाडहून दुपारी चार वाजता निघालेली गाडी ताशी १०० कि.मी.च्या गतीने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. आठ बोगींची रेल्वे शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्टेशनवर व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे या गाडीचे उद्घाटन होणार आहे.
तिकीट दराची, बुकिंगची प्रतीक्षा
या रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी किती तिकीट दर मोजावे लागेल, याची प्रवाशांना उत्सुकता आहे. मात्र, तिकीट दर आणि ऑनलाइन यंत्रणेत तिकिटाची बुकिंग गुरुवारी सायंकाळपर्यंत रेल्वेकडून जाहीर करण्यात आले नव्हते. ९०० ते १२०० रुपयांदरम्यान भाडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली.