वॉर्ड सुरक्षा दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:49 AM2017-07-27T00:49:46+5:302017-07-27T00:49:59+5:30

१०० तरुणांचे वॉर्ड सुरक्षा दल तयार करण्यात आले

vaorada-saurakasaa-dala | वॉर्ड सुरक्षा दल

वॉर्ड सुरक्षा दल

googlenewsNext
ठळक मुद्देभाग्यनगर पोलिसांनी आता कम्युनिटी पोलिसिंगतरुण गटागटाने ठरवून दिलेल्या भागात रात्रभर दुचाकीवरुन पेट्रोलिंग करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत सातत्याने घरफोडी आणि चोरीच्या घटना घडत आहेत़ त्यामध्ये होणारी वाढ लक्षात घेता भाग्यनगर पोलिसांनी आता कम्युनिटी पोलिसिंग सुरु केली आहे़ त्याअंतर्गत १०० तरुणांचे वॉर्ड सुरक्षा दल तयार करण्यात आले असून ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रमही राबविण्यात येत आहे़ त्यामुळे गेल्या काही महिन्यांत या भागातील चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे़
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार मोठा आहे़ त्यामुळे पेट्रोलिंगसाठी पोलिसांची गैरसोय होते़ त्यात चोरट्यांसाठी तर ही हद्द सोयीचीच झाली होती़ कुलूपबंद घर दिसताच चोरट्यांकडून दिवसाढवळ्या डल्ला मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ त्यात भ्रमणध्वनी, सोनसाखळी चोरटेही सक्रिय झाले होते़
या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, सपोनि शरद मरे, आऱजी़ सांगळे, पोउपनि चंद्रकांत पवार यांनी या भागात वॉर्ड सुरक्षा दलाची स्थापना केली़ त्यामध्ये भाग्यनगर हद्दीतील १०० तरुणांचा समावेश आहे़ या तरुणांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत़ आठवड्यातून एक दिवस हे तरुण गटागटाने ठरवून दिलेल्या भागात रात्रभर दुचाकीवरुन पेट्रोलिंग करणार आहेत़ त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारीही असणार आहे़ पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे गेल्या काही महिन्यांत या भागातील चोरीच्या घटनांमध्ये जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे़ त्याचबरोबर पोलीस आणि नागरिकांचा थेट संवादही होत आहे़

‘आपला शेजारी खरा पहारेकरी’
चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रमही सुरु करण्यात आला आहे़ त्यानुसार बाहेरगावी जाणार असाल तर शेजाºयांना माहिती द्या, घर बंद करुन जाताना घरात रोख रक्कम, दागिने असा ऐवज ठेऊ नका, कडीकोंड्याऐवजी सेंट्रिंग लॉकचा वापर करा, दरवाजाला आय होल असणे आवश्यक आहे़ अनोळखी इसम, भविष्य वर्तविणारा, सोने उजळून देणाºयाला घरात प्रवेश देऊ नये, आपआपल्या भागात सामूहिक प्रयत्नातून सीसीटीव्ही लावण्याकरिता प्रयत्न करावेत, खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करा, दूधवाला, भाजीविक्रेते, चालक, इलेक्ट्रीशियन, घरकाम करणारे यांचा संपूर्ण पत्ता आणि फोटो ठेवावा, शेजारी बांधकाम सुरु असल्यास कामगार, ठेकेदाराची संपूर्ण माहिती ठेवावी, बाहेरगावी जाताना घरातील दिवे सुरु ठेवावेत, रात्रीच्या वेळी घराबाहेरील दिवा सुरु ठेवावा, जेणेकरुन पोलिसांना पेट्रोलिंग करताना मदत होईल, बाहेरगावी असल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: vaorada-saurakasaa-dala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.