संतपीठ आणि सौरऊर्जा प्रकल्पासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्याच्या विविध घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 12:21 PM2021-09-17T12:21:26+5:302021-09-17T12:21:54+5:30
Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे हुतात्म्यांना अभिवादन केले.
औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेऔरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
आपल्या संबोधनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक दिवसांपासून संतपीठाची मागणी होती. आता मुख्यमंत्र्यांनीच या संतपीठाची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केले जाणार आहे. हे संतपीठ मोठं व्हावं आणि यातून महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, अशी आपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/o7XsLTIyGq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
निजामकालीन शाळांचा पुनर्विकास
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील 150 निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. निजामशाहीच्या काही खुणा आहेत, त्या आता जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातल्या सुमारे 150 शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सौरऊर्जा प्रकल्प
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच औरंगाबादमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार, औरंगाबाद-शिर्डी 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ करण्यात येणार, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या 194.48 किमीच्या जालना-नांदेड महामार्गाला देखील गती देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी घोषणा
- निजामकालीन 150 शाळांचा पुर्नविकास
- औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करणार
- 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प
- हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी 6 कोटी निधी
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
- औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
- सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये
- औरंगाबादच्या मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317. 22 कोटी रुपये निधी
- परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. 350 कोटी रुपयांची तरतूद
- परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. 105 कोटी
- उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
- हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगासाठी4.50 कोटी
-हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी 86.19 कोटी रुपये
- नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी 66.54 कोटी रुपये निधी
- घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास कऱण्यासाठी वाढीव 28 कोटी रुपये