छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:02 AM2021-05-18T04:02:07+5:302021-05-18T04:02:07+5:30
-------------------------- वाळूजला मुख्य रस्त्यावर अंधार वाळूज महानगर : वाळूजला मुख्य रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिक व वाहनधारकांना अंधारातूनच ये-जा करावी ...
--------------------------
वाळूजला मुख्य रस्त्यावर अंधार
वाळूज महानगर : वाळूजला मुख्य रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिक व वाहनधारकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. ग्रामपंचायत सक्षम असतानाही या मुख्य रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. रात्रीच्यावेळी या रस्त्यावर सतत अपघात घडत असल्याने या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
------------------------------
पाटोदा शिवरस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : पाटोदा व विक्रांत गेट या शिवरस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. या शिवरस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, खडी निखळून वर आली आहे. पाटोदा गावात ये-जा करण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर कामगार व नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
--------------------------
छावातर्फे संभाजीराजेंना अभिवादन
वाळूज महानगर : अखिल भारतील छावा संघटन व श्रमिक संघटनेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमत्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवाजी मार्कंडे, मनोहर सनेर, गिरीधर चव्हाण, योगेश निलंगेकर, शिवनाथ काळे, सहदेव घोडके, अविनाश सोनवणे, नवनाथ काळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
----------------------