भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:04 AM2021-04-25T04:04:06+5:302021-04-25T04:04:06+5:30
भगवंत जन्मोत्सव तसेच पाळणा महोत्सव कार्यक्रम रविवारी घराघरातून अतिशय श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येईल. घरात साजरा होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पारंपरिकतेसोबतच ...
भगवंत जन्मोत्सव तसेच पाळणा महोत्सव कार्यक्रम रविवारी घराघरातून अतिशय श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येईल. घरात साजरा होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पारंपरिकतेसोबतच आकर्षक सजावट करणाऱ्या कुटुंबांची निवड करून त्यांना समितीतर्फे सन्मानित करण्यात येईल.
भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवून त्याभोवती आकर्षक सजावट करणे, प्रत्येक घरात जैन ध्वज लावणे तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत अखंड दिवा लावून महावीर जयंती साजरी करणे, असे अनेक उपक्रम महिला समितीतर्फे राबविण्यात येणार आहेत.
चौकट :
अहिंसा भवन येथे आज रक्तदान शिबिर
श्रावक संघ सिडको, सिडको रॉयल जैन ग्रुप, शांती ग्रुप औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको एन ३ येथील अहिंसा भवन येथे दि. २५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करून आणि सामाजिक दायित्व म्हणून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल संचेती, कार्याध्यक्ष निलेश सावलकर, राजेश मुथा, निलेश पहाडे, राजेंद्र पगारिया, प्रतीक साहुजी आदींनी केले.
चौकट :
पोलिसांना अल्पोपाहार वाटप
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शनिवारी शहरातील ६० पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार वाटप करण्यात आला.