वरुण धवन घेऊन येतोय ‘भेडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:05 AM2021-02-23T04:05:32+5:302021-02-23T04:05:32+5:30

दिनेश विजन यांच्या आगामी ‘भेडिया’ या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वरुण ...

Varun Dhawan brings 'Wolf' | वरुण धवन घेऊन येतोय ‘भेडिया’

वरुण धवन घेऊन येतोय ‘भेडिया’

googlenewsNext

दिनेश विजन यांच्या आगामी ‘भेडिया’ या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वरुण सोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका कृती सेनन साकारणार आहे. वरुण धवनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचा टीझर शेअर केलाय. “भेडिया का प्रणाम, स्त्री और रुही को” असं कॅप्शन देत वरुणने त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमाची बातमी दिलीय. १४ एप्रिल २०२२ या सालात ‘भेडिया’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भेडिया’ सिनेमाच्या टीझरमध्ये पौर्णिमेच्या रात्री एक व्यक्ती लांडगा बनत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाची घोषणा

सध्या सोशल मीडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्यानं तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडलं आहे. मात्र, हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून ‘मंगलाष्टक रिटर्न’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाअंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बॉबी देओलने यशाचे श्रेय दिले या व्यक्तीला

बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या आश्रम या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगली होती. बॉबी या वेबसिरिजमध्ये एका बाबाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते आणि आता त्याला या भूमिकेसाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड मिळाला आहे. सोशल मीडियावर आईसोबतचा एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी त्याने आपल्या चाहत्यांना दिली आहे. या पुरस्काराचं श्रेय त्याने आपल्या आईला दिलं आहे.

Web Title: Varun Dhawan brings 'Wolf'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.