बाजारात उदंड झाल्या भाज्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:02 AM2021-01-04T04:02:11+5:302021-01-04T04:02:11+5:30
औरंगाबाद : पोषक वातावरणामुळे भाज्यांची मोठी आवक भाजीमंडईत होत आहे. विक्रीनंतर शिल्लक राहिलेल्या भाज्या कचऱ्यात फेकून दिल्या जात आहे. ...
औरंगाबाद : पोषक वातावरणामुळे भाज्यांची मोठी आवक भाजीमंडईत होत आहे. विक्रीनंतर शिल्लक राहिलेल्या भाज्या कचऱ्यात फेकून दिल्या जात आहे.
जाधववाडी आडत बाजारात सध्या भाज्यांची प्रचंड आवक होत आहे. सर्वत्र भाज्यांचभाज्या दिसत आहेत. आडत बाजारात भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी स्वतःच शहरात फिरून भाज्या विकताना दिसून आले. १० रुपयांना ४ जुडी कोथिंबीर विकल्या जात आहे. मेथी, पालक या भाज्या १० रुपयांच्या ४ किंवा ३ जुडी विकल्या जात आहे. शहागंज भाजी मंडईत २० रुपयाला दीड किलो बटाटा विकला जात होता. टोमॅटो ५ ते ८ रुपये किलो एवढ्या कमी भावात विकूनही शिल्लक राहिले. शेकडो किलो टोमॅटो कचऱ्यात फेकून दिले जात आहे. दोडके २० रुपये, भेंडी ३० रुपये किलो विकली जात आहे. आडत बाजारात २५० टनांपेक्षा अधिक भाज्या विक्रीला येत आहेत. त्यातील १० ते २० टन पेक्षा अधिक भाज्या शिल्लक राहत आहेत.
पुढील महिन्यात नवीन ज्वारी मोंढ्यात विक्रीला येईल. यामुळे साठेबाजी करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांनी मागील वर्षीच्या ज्वारी विक्रीला काढल्याने ज्वारीचे भाव किलोमागे २ रुपयांनी घसरून २२ ते ३५ रुपये किलोने विकली जात आहे. मात्र, गव्हाच्या भावात किलोमागे ६० ते ७० रुपयांनी वाढ होऊन २० ते ३२ रुपये किलोने विक्री होत आहे. नवीन गहू फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी विक्रीला येणार आहे.
चौकट
भाज्या २८ डिसेंबर २ जानेवारी
कोथिंबीर २.५० रुपये (जुडी) २ रुपये
मेथी २.५० रुपये (जुडी) २ रुपये
टोमॅटो १० रुपये ५ ते ८ रुपये
भेंडी ४० रुपये २५ ते ३० रुपये
----------
चौकट
धान्य २८ डिसेंबर २ जानेवारी
गहू १९ ते ३१ रु (किलो) २० ते ३२ रु
ज्वारी २४ ते ३४ रु २२ ते ३२ रु
हरभरा डाळ ५३ ते ५७ रु ५३ ते ५७ रु
वनस्पती तूप ११० ते १२५ ११० ते १२५ रु
---
नवीन गहू, ज्वारी पुढील महिन्यात
नवीन गहू व ज्वारीची आवक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू हॊईल. यंदा पोषक वातावरणमुळे उत्पादनही चांगले राहील.
नीलेश सोमाणी
होलसेल व्यापारी
--
भाजीपाला विक्री करणे महाग
भाजीपाल्या मातीमोल भावात विकल्या जात आहे. शेतातून जाधववाडी आडत बाजारात विक्रीला आणणे परवडत नाही.
नानासाहेब पवार
शेतकरी
--
भाज्यावर भर
सध्या भाज्या स्वस्त मिळत आहे. कांदे, बटाटे, टोमॅटो स्वस्त झाले आहे. यामुळे हिवाळ्यात भाज्या खाण्याचा आनंद लुटत आहे.
स्वाती वैष्णव
गृहिणी, शिवाजीनगर