औरंगाबादच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने पालेभाज्या मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:32 AM2018-11-23T11:32:36+5:302018-11-23T11:34:46+5:30
भाजीपाला : चोहो बाजंूनी आवक वाढल्याने औरंगाबाद येथील अडत बाजारात पालेभाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागल्या.
चोहो बाजंूनी आवक वाढल्याने औरंगाबाद येथील अडत बाजारात पालेभाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागल्या. पालेभाज्यांची मोठी आवक झाली होती. यामुळे तिथेच किरकोळ विक्रीत मेथी १० रुपयांत चार गड्डी, तर पालक अक्षरश: १ रुपयात १ गड्डी मिळत होता. कांदापात १० रुपयाला ५ गड्डी घेण्यास कोणी तयार नव्हते.
याशिवाय टोमॅटो १० रुपयांत दीड किलो, गिलके १० रुपये, गवार १० रुपये, तर भेंडी २० रुपये किलोने विकली जात होती. पहाटे ४ वाजेपासून पालेभाज्यांची विक्री सुरू होती, तरीही दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्के पालेभाज्या शिल्लक राहिल्या होत्या.
शेतकरी रमेश हिवराळे यांनी सांगितले की, आज मेथी, कांदापात विक्रीला आणली होती. आवक जास्त व ग्राहक कमी असल्याने मेथी १० रुपयांत ४ गड्डी विक्री कराव्या लागल्या. हीच मेथी मात्र, शहरात गल्लोगल्ली ८ रुपये गड्डी, तर कुठे १० रुपयांत २ गड्डी विकली जात होती.