छावणी रेल्वे ओहरब्रीजवर वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:05 AM2021-09-24T04:05:22+5:302021-09-24T04:05:22+5:30

पुलावरील खड्ड्यामुळे दररोज वाहतूक कोंडी वाळूज महानगर : औरंगाबाद- नगर महामार्गावरील छावणी रेल्वे ओहरब्रीजवरील खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होते ...

Vehicle owners suffer due to traffic jam on Camp Railway Overbridge | छावणी रेल्वे ओहरब्रीजवर वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त

छावणी रेल्वे ओहरब्रीजवर वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त

googlenewsNext

पुलावरील खड्ड्यामुळे दररोज वाहतूक कोंडी

वाळूज महानगर : औरंगाबाद- नगर महामार्गावरील छावणी रेल्वे ओहरब्रीजवरील खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होते आहे. यामुळे वाहनधारक, उद्योजक व कामगार त्रस्त आहेत.

या पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. यंदा जोरदार पावसामुळे या पुलावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. औरंगाबाद- नगर महामार्गावरील या उड्डाणपुलावरून दररोज हजारो वाहनांची ये- जा सुरू असते. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील अधिकारी- कर्मचारी, कामगार, प्रवासी, तसेच वाहनधारक या कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. पुलावर दररोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने कामगारांंची ने- आण करणाऱ्या बस कारखान्यांत उशिरा पोहोचत असल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. कोंडीतून वाहतुकीची सुटका व्हावी, यासाठी अनेक वाहनधारक लिंक रोडमार्गे मोठा वळसा घालून ये- जा करीत असल्याने वेळेचा अपव्यय होत असून, इंधनाचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. खड्डे बुजविण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांतून होत आहे.

फोटो ओळ-

औरंगाबाद- नगर महामार्गावरील छावणी रेल्वे ओहर ब्रीजवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अशी वाहतूक कोंडी होते आहे.

Web Title: Vehicle owners suffer due to traffic jam on Camp Railway Overbridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.