गांडूळ खत प्रकल्प कुचकामी
By Admin | Published: June 23, 2017 12:54 AM2017-06-23T00:54:48+5:302017-06-23T00:54:48+5:30
आरमोरी तालुक्यातील शंकरनगर ग्राम पंचायतीअंतर्गत दोन वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या गांडूळ खत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुक्ताईनगर येथून आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे निघालेली संत मुक्तार्इंच्या पालखीचे बीडमध्ये दोन दिवस मुक्कामानंतर गुरुवारी पालीच्या दिशेने प्रस्थान झाले. सकाळी सात वाजता बिंदुसरा नदीच्या काठावरील ब्र. गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी आजोबा- नातीच्या भेटीचा अपुर्व योग उपस्थित भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.
संत मुक्तार्इंचे आजोबा ब्र. गोविंदपंत यांची समाधी बीड येथे बिंदुसरेच्या काठावर आहे. मागील दहा वर्षांपासून तेथे आजोबा नातीची भेट होते. मंगळवारी हनुमान मंदिरात आणि बुधवारी बालाजी मंदिरात मुक्कामानंतर गुरुवारी पहाटे संत मुक्ताईंच्या पादुका गोविंदपंत संस्थानचे सहसचिव डॉ. धनंजय रामदासी यांनी डोईवर घेत समाधीस्थळी आणल्या. त्यानंतर पूजन आणि आरती सोहळा झाला.
संत मुक्तार्इंचे आणि बीडचे आगळे नाते आहे. संत ज्ञानेश्वर, संत मुक्तार्इंचे आजोबा गोविंदपंतांची समाधी येथे असल्याचे अनेक वर्षानंतर उजेडात आले. आजोबा नातीच्या भेटीच्या या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत, अशी भावना संत मुक्ताई पालखीचे दिंडीप्रमुख रवींद्र हरणे यांनी व्यक्त केली. या वेळी एकनाथ महाराज पुजारी, धुंडीराज महाराज पाटंगणकर, सुरेश मेखे, चंद्रकांत जोशी, संदीप मुळे, जयसिंग चुंगडे, दत्ता अदवंत, आदे गुरुजी, काकडे तसेच पालखीतील वारकरी, शहरातील भाविक उपस्थित होते.