५०० स्वयंसेवी संस्थांवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:25 PM2017-11-17T23:25:07+5:302017-11-17T23:25:18+5:30
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थांची तपासणी सुुरु आहे. यामध्ये आतापर्यंत ५०० संस्थांची नोंदणी रद्द केल. असून अजून ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर आहे. यामुळे मात्र संस्थाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर कधीच कामे न केलेले संस्थाचालक कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थांची तपासणी सुुरु आहे. यामध्ये आतापर्यंत ५०० संस्थांची नोंदणी रद्द केल. असून अजून ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर आहे. यामुळे मात्र संस्थाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर कधीच कामे न केलेले संस्थाचालक कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.
धर्मादाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे जवळपास ७५०० स्वयंसेवी संस्थांनी रीतसर नोंदणी केलेली आहे. पहिल्या टप्प्यात यातील ५०० संस्थांनी आपले मागील पाच वर्षापर्यंतचा तपासणी अहवाल, कुठल्याही प्रकारचे बदल अर्ज कार्यालयाकडे सादर केले नाहीत. त्यामुळे अशा संस्थांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या होत्या. परंतु संबंधित संस्थेकडून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद न आल्याने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करीत धर्मादाय सहाय्यक आयुक्तांनी जिल्ह्यातील संस्थांची तपासणी सुरू केली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चाचपणी केली असता तब्बल ५०० संस्थांनी कुठल्याच प्रकारच्या तपासणी अहवाल किंवा बदल अर्जाशिवाय प्रकरणे बोर्डावर ठेवलेली नसल्याचे तपासणीत समोर अले. त्यामुळे सहायक धर्मादाय आयुक्तांनी ५०० संस्थेची नोंदणी रद्द केली आहे. अजूनही ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर येणार आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून निष्क्रिय असणाºया स्वयंसेवी संस्था आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ज्या संस्थांनी धर्मादाय कार्यालयाकडे कुठलेच बदल अर्ज किंवा मागील पाच वर्षांचे ‘आॅडिट’ करून दिले नाही, अशा नोंदणीकृत संस्थांनी तातडीने कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन धर्मादाय सहआयुक्तांनी केले आहे.