ज्येष्ठ व्यापारी मदनभाई जालनावाला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:29 AM2018-07-18T01:29:35+5:302018-07-18T01:29:54+5:30

शहरातील ज्येष्ठ व्यापारी मदनभाई नवनीतदास जालनावाला (७१) यांचे मंगळवारी (दि.१७) सायंकाळी हृदयविकाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

Veteran businessman Madanbhai Jalnawala passed away | ज्येष्ठ व्यापारी मदनभाई जालनावाला यांचे निधन

ज्येष्ठ व्यापारी मदनभाई जालनावाला यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ज्येष्ठ व्यापारी मदनभाई नवनीतदास जालनावाला (७१) यांचे मंगळवारी (दि.१७) सायंकाळी हृदयविकाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.
सुपारी हनुमान रोडवरील त्यांच्या निवासस्थानापासून बुधवारी (दि.१८) सकाळी १० वा. अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय होते. जिल्हा व्यापारी महासंघाच्या स्थापनेमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी महासंघाचे उपाध्यक्षपदही भूषविले होते. हसतमुख चेहरा, रुबाबदार मिशा अशी त्यांची ओळख बनली होती. औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनचे (आयसा) अध्यक्ष, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. विशेषत: व्हॅट, जकात, एलबीटी रद्द करण्यासाठी शहरातून सुरू झालेल्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. व्यापारी महासंघाचा जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स, मासिआ, सीएमआयएच्या उपक्रमातही हजेरी लावत असत. ते सामाजिक कार्यातही तेवढेच अग्रेसर होते. लायन्स क्लब आॅफ औरंगाबादच्या अध्यक्षपदासह मागील ३५ वर्षांत त्यांनी या क्लबची विविध पदे भूषवीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. लायन्स बालसदनच्या उभारणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. योगदानाबद्दल लायन्स क्लबतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता. रामकृष्णदास सेवा ट्रस्टचे माजी सचिव, गुजराती समाज विकास मंडळाचे माजी सचिव, द्वारकाधीश मंदिर, सात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. नागर समाजाच्या संघटनेतही त्यांनी सचिवपदावर कार्य केले. गुजराती समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी परिश्रम घेतले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले.

Web Title: Veteran businessman Madanbhai Jalnawala passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.