पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:27 PM2018-11-16T17:27:46+5:302018-11-16T17:29:55+5:30
पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
पैठण (औरंगाबाद ) : पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. पुढीलवर्षी २ व ३ फेब्रुवारीला या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अॅड. सतीश बोरूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजार व्यवस्थेत शेतीचे भवितव्य, ग्रामीण स्त्री गुलामांची गुलाम, सनातन शेतीचा चक्रव्यूह, शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक, शेतीचे भवितव्य पत्रकारितेच्या नजरेतुन, कर्जमुक्ती शेतीची की शेतकऱ्यांची, जनुकीय तंत्रज्ञान शोध आणि बोध आणि लावू पणाला प्राण अशा विविध विषयांवर परिसंवाद राहणार आहेत.
संमेलनाच्या उद्घाटनास भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, गंगाधर मुटे, गीताताई खांडेभराड, आप्पासाहेब कदम, बाबुराव गोल्डे, राजीव जावळे, प्रकाशसिंह पाटील, कडु पाटील, कैलास तवार यांची उपस्थिती राहणार आहे.