विद्यापीठ अधिसभा निवडणूक, संवेदनशिल मतदान केंद्रावर कुलगुरूंचे विशेष लक्ष

By योगेश पायघन | Published: November 17, 2022 07:18 PM2022-11-17T19:18:31+5:302022-11-17T19:19:00+5:30

कर्मचाऱ्यांना २१ आणि २३ नोव्हेंबरला मतदान प्रक्रीयेसाठी प्रशिक्षण

Vice-Chancellor pays special attention to the University Adhi Sabha Elections, sensitive polling stations | विद्यापीठ अधिसभा निवडणूक, संवेदनशिल मतदान केंद्रावर कुलगुरूंचे विशेष लक्ष

विद्यापीठ अधिसभा निवडणूक, संवेदनशिल मतदान केंद्रावर कुलगुरूंचे विशेष लक्ष

googlenewsNext

औरंगाबाद-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातील १० जागांसाठी सहा गटाच्या सहा रंगात २ लाख ४० हजार मतपत्रिकांची इनहाऊस छपाई पुर्ण करण्यात आली आहे. एका बुधवर विद्यापीठाचे ३, महाविद्यालयाचे २ असे एकूण ४१५ जणांची नियुक्ती करण्यात आली. तसेच संवेदनशिल व अतीसंवेदनशिल मतदान केंद्रांची यादी निश्चित केली. निवडणूक सुरळीत व पारदर्शक पार पाडण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

अधिसभेच्या पदवीधर गटतून खुल्या प्रवर्गातून सर्वांधिक २९, महिला ४, अनूसुचित जाती ७, अनूसूचित जमाती ४, इतर मागास वर्ग ४ तर भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून ५ असे एकुण ५३ अर्ज पहिल्या फेरीतील मतदानासाठी रिंगणात असणार आहे. एकुण ३६ हजार ८८२ मतदारांसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका, अनूसुचित जातीसाठी फिकट निळा, अनूसूचित जमातीसाठी पिस्ता, इतर मागास वर्गासाठी फिकट पिवळा, भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गासाठी फिकट हिरवा रंगाची मतपत्रिका असतील. या छपाई विद्यापीठाच्या प्रिंटीग टेक्नाॅलाॅजी विभागात पुर्ण झाली असून त्याची नुकतीच पाहणी करून आढावा घेतल्याचे कुलगुरू डाॅ. येवले यांनी सांगितले. मतमोजणीसाठी अनुभवी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली. यात डाॅ. एस. एन.दाते, डाॅ. पी. बी. पापडीवाल, डाॅ. अनिता मुरूगकर, डाॅ. सचिन देशमुख, डाॅ. मुस्तजीब खान, डाॅ. प्रविण यन्नावार, डाॅ. किर्तीवंत घडेले हे कर्मचाऱ्यांना २१ आणि २३ नोव्हेंबरला मतदान प्रक्रीयेसाठी प्रशिक्षण देणार आहेत.

५१ मतदार केंद्रावर ८३ बुथ
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ५१ मतदार केंद्रावर ८३ बुथ असतील. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ३४ बुधवर १७,७६५, बीड २६ बुधवर १२,५९३, जालना ११ बुथवर ३९९३, उस्मानाबाद १२ बुथवर २५३१ उमेदवार असतील. दुसऱ्या टप्प्यात विभागप्रमुख १४६७, व्यवस्थापन प्रतिनीधी १७०, प्राचार्य ७८, अध्यापक २५८७, विद्यापीठ अध्यापक १२८ तर पदवीधर मतदार ३६,८८२ मतदार असतील.

Web Title: Vice-Chancellor pays special attention to the University Adhi Sabha Elections, sensitive polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.