महाराष्ट्राचा बडोदा संघावर डावाने विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:00 AM2019-02-01T01:00:35+5:302019-02-01T01:02:26+5:30

बीडच्या सचिन धसची सुरेख द्विशतकी खेळी आणि परभणीच्या सौरभ शिंदे याचे ५ बळी या जोरावर महाराष्ट्राने मुंबई येथे पश्चिम विभागीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघावर एक डाव व २४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राने त्यांचा डाव ७ बाद ४३० धावांवर घोषित केला. महाराष्ट्राकडून बीडच्या सचिन धस याने २३८ चेंडूंत ४४ चौकार व एका षटकारासह २२८ धावांची जबरदस्त खेळी केली.

Victory in the Baroda team of Maharashtra | महाराष्ट्राचा बडोदा संघावर डावाने विजय

महाराष्ट्राचा बडोदा संघावर डावाने विजय

googlenewsNext
ठळक मुद्देपश्चिम विभागीय स्पर्धा : सचिन धसचे द्विशतक, सौरभ शिंदेचे ५ बळी

औरंगाबाद : बीडच्या सचिन धसची सुरेख द्विशतकी खेळी आणि परभणीच्या सौरभ शिंदे याचे ५ बळी या जोरावर महाराष्ट्राने मुंबई येथे पश्चिम विभागीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघावर एक डाव व २४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
महाराष्ट्राने त्यांचा डाव ७ बाद ४३० धावांवर घोषित केला. महाराष्ट्राकडून बीडच्या सचिन धस याने २३८ चेंडूंत ४४ चौकार व एका षटकारासह २२८ धावांची जबरदस्त खेळी केली, तसेच त्याने सौरभ कुंभार याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी २२५ धावांची भागीदारी केली. सौरभने १३२ चेंडूंत १३ चौकारांसह ७० धावांची खेळी केली. त्यानंतर सौरभ शिंदेच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा संघाचा पहिला डाव १७३ धावांत गुंडाळला. बडोदा संघाकडून डॅक्स बाबरिया याने ६५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सौरभ शिंदेने ३१ धावांत ५ गडी बाद केले. त्याला शिवराज शेळके व ओमकार राजपूत यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. पहिल्या डावात २५७ धावांची आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने दुसºया डावात फलंदाजी न करता बडोदा संघावर फॉलोआॅन लादत त्यांचा दुसरा डाव २३३ धावांत गुंडाळताना विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून दुसºया डावात शिवराज शेळकेने ४७ धावांत ३ व चैतन्य पाटीलने ७७ धावांत ३ गडी बाद केले. सौरभ शिंदेने १ गडी बाद केला.

Web Title: Victory in the Baroda team of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.