लाेकप्रतिनिधींना विजयदिनाचे विस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:30+5:302020-12-17T04:33:30+5:30
औरंगाबाद : भारतीय सेनेच्या पराक्रमामुळे १६ डिसेंबर १९७१ राेजी बांगलादेश अस्तित्वात आला. त्या युद्धाला आज ...
औरंगाबाद : भारतीय सेनेच्या पराक्रमामुळे १६ डिसेंबर १९७१ राेजी बांगलादेश अस्तित्वात आला. त्या युद्धाला आज ५० वर्षे झाली. या युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी बुधवारी नगरनाक्यावरील शहीद स्मारकाकडे एकही लाेकप्रतिनिधी फिरकला नाही.
त्यामुळे माजी सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहिदांचे स्मरण करणे हे सैन्यदलातील माजी अधिकारी आणि सैनिकांचेच कर्तव्य आहे का, अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.
नगर नाक्यावरील शहीद स्तंभाजवळ सैन्य दलातील निवृत्त सैनिक, अधिकारी, सैनिकांच्या विधवा पत्नी, माता अभिवादनासाठी पुष्पहार घेऊन आल्या हाेत्या. भारत - पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, अशाेक हांगे, गजानन पिंपळे, सुभेदार काशीनाथ पवार यांच्याह आयईएसएल, महाराष्ट्र, जय जवान, जय किसान सैनिक फेडरेशन, त्रिदल सैनिक संघटना आदींचे पदाधिकारी, त्यांचे कुटुंबीय अभिवादनासाठी आले हाेते.