शहर पोलीसचा बँकर्सवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:44 AM2017-12-02T00:44:59+5:302017-12-02T00:46:01+5:30

व्हेरॉक करंडक ट्वेंटी २0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गिरिजानंद भक्तच्या नेतृत्वाखालील शहर पोलीस अ संघाने कम्बाईन बँकर्स संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Victory over city police's bankers | शहर पोलीसचा बँकर्सवर दणदणीत विजय

शहर पोलीसचा बँकर्सवर दणदणीत विजय

googlenewsNext
ठळक मुद्देशेख मुकीमची स्फोटक खेळी : विजय मेहेत्रेची अष्टपैलू कामगिरी

औरंगाबाद : व्हेरॉक करंडक ट्वेंटी २0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गिरिजानंद भक्तच्या नेतृत्वाखालील शहर पोलीस अ संघाने कम्बाईन बँकर्स संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसºया लढतीत स्कोडा संघाने आयजीटीआर संघावर एका धावेने चित्तथरारक मात केली. स्फोटक फलंदाजी करणारा शेख मुकीम आणि अष्टपैलू कामगिरी करणारा विजय मेहेत्रे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात स्कोडा संघाने २0 षटकांत ६ बाद १३१ धावा केल्या. त्यांच्याकडून विपुल भोंडेने ३0 चेंडूंत ६ चौकारांसह ३६, संदीप खोसरेने २२ व विजय मेहेत्रेने २0 धावा केल्या. आयजीटीआर संघाकडून संदीप बलांडे याने १७ धावांत ३ गडी बाद केले. दीपक जगतापने २ व मनोज भाले याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयजीटीआर संघ १९.१ षटकांत १३0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून दीपक जगतापने १९, संदीप बलांडेने १७, सुशील नाईकने १५ व सागर गाडेकरने १४ धावा केल्या. स्कोडाकडून विजय मेहेत्रेने ३३ धावांत ३ गडी बाद केले. संदीप खोसरे व निझाम शेख यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. योगेश भागवत व पवन कावले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुपारच्या सत्रात कम्बाईन बँकर्सचा संघ ५ बाद ११२ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून मिलिंद पाटीलने ६ चौकार, एका षटकारासह ४७, दिनेश कुंटेने २७ व प्रदीप जगदाळेने १६ धावांचे योगदान दिले. शहर पोलीस अ संघाकडून गिरिजानंद भगतने २४ धावांत ३ गडी बाद केले. शेख इफ्तेखार व मोहमद इम्रान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शेख मुकीमच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर शहर पोलीसने १९.१ षटकांत विजयी लक्ष्य २ गडी गमावून गाठले. शेख मुकीमने ४५ चेंडूंत १0 चौकार व एका षटकारासह नाबाद ७0 धावांची वादळी खेळी केली. शेख असीफनेही २६ चेंडूंतच ३ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.

Web Title: Victory over city police's bankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.