Video: संकट कायम! औरंगाबादेत धावत्या 'शिवशाही' बसमधून डिझेलची गळती, धोका टळला
By संतोष हिरेमठ | Published: November 3, 2022 05:31 PM2022-11-03T17:31:54+5:302022-11-03T17:35:18+5:30
बस पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकात आणण्यात आली.
औरंगाबाद : पुण्यात दोन दिवसांपूर्वी शिवशाही बसला भीषण आग लागण्याची घटना ताजी असताना औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसच्या डिझेल टाकीचा पाईपमधून डिझेलची गळती झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घटली. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने कोणतीही घटना घडली आहे.
औरंगाबाद: ‘शिवशाही’वर संकट कायम, औरंगाबादेत धावत्या शिवशाही बसमधून डिझेलची गळती, धोका टळला#Aurangabadpic.twitter.com/x87io5wiEV
— Lokmat (@lokmat) November 3, 2022
यासंदर्भात प्रवाशांनी दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्याला जाण्यासाठी शिवशाही बस रवाना झाली. ही बस मिलकाॅर्नर रस्त्यावर येत नाही तोच डिझेलची गळती होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे ही बस पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकात आणण्यात आली. याठिकाणी प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आली.