बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी

By बापू सोळुंके | Published: December 31, 2022 06:59 PM2022-12-31T18:59:21+5:302022-12-31T19:05:57+5:30

आमदार पुत्र आणि केटरिंग व्यावसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल

Video: Demanded meal bill, MLA Sanjay Shirsat's son threatens catering businessman to death | बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी

बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी

googlenewsNext

औरंगाबाद: वाढदिवसाच्या पार्टीसाठी दिलेल्या जेवणाचे बिल मागणाऱ्या केटरींग व्यवसायिकाला आमदार पुत्र तथा माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाटने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. केटरिंग व्यवसायिक आणि शिरसाट यांच्यातील ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हारयल झाल्याने शहरात चर्चेला सुरवात झाली.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या व्हायरल झालेल्या क्लीपविषयी केटरींग व्यवसायिक त्रिशरण सत्यवान गायकवाड यांनी सांगितले की, २०१७ साली त्यांना आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जेवणाची ऑर्डर मिळाली होती. या जेवणाचे बील साडेचार लाख रुपये झाले होते. तेव्हा आ.शिरसाट यांच्या आग्रहावरून आम्ही एकूण बिलात ७५ हजार रुपये कमी केले होते. यानंतर उर्वरित पैसे थोडे,थोडे करून देण्यास सुरवात केली. त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर सिद्धांत यांनी आम्हाला धमक्या दिल्या होत्या. आता १७ डिसेंबर रोजी जेवणाचे बाकी बिलाची मागणी केली म्हणून फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सिद्धांतविरोधात मुकुंदवाडी पेालीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयात तकार करणार असल्याचे गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गायकवाड आणि सिद्धांत यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी सिद्धांत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Video: Demanded meal bill, MLA Sanjay Shirsat's son threatens catering businessman to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.