Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:49 AM2022-07-10T11:49:23+5:302022-07-10T11:51:20+5:30
वरुड येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एक आदर्श समाजापुढे निर्माण केल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
करमाड - औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात व आनंदात विठ्ठल रुक्माईची दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली. मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा सण व व हिंदू धर्माची पवित्र अशी आषाढी एकादशी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्याने वरुड येथील मुस्लिमांच्या वतीने या दिवशी कुर्बानी देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे वरुड येथील सरपंच दिलावर बेग यांनी सांगितले.
रविवारी आषाढी एकादशी निमित्त औरंगाबाद तालुक्यातील बहुसंख्य गावात ग्रामस्थांच्या वतीने तसेच शाळा, खासगी शिकवणी अशा विविध संस्थांच्या वतीने दिंडी काढून, तुकोबारायाचे अभंग वाचून , विठूरायाचा गजर करत मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी व रमजान ईद साजरी करून हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोपाचा मोठा संदेश औरंगाबाद तालुका जिल्हा सह इतर सर्वांना दिला. यानिमित्ताने वरुड येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एक आदर्श समाजापुढे निर्माण केल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी#AshadhiEkadashi2022pic.twitter.com/31ovYnqynS
— Lokmat (@lokmat) July 10, 2022
वरुड काजी येथे चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या वतीने मागील चार दिवसांपूर्वी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद हा सण आल्यामुळे मुस्लिमांच्या वतीने कुर्बानी देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून हिंदू धर्मियांच्या भावनेचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला. असे वरुडचे सरपंच दिलावर बेग यांनी जाहीर केले होते व त्या दृष्टीने वरुड काजी येथे कुर्बानीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला व हिंदू मुसलमान बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात एकादशी व बकरी ईद साजरी केली. यावेळी चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठण्याचे कर्मचारी व अधिकारी यांनी देखील दिंडीत टाळ घेऊन भजन गात सहभाग नोंदवला.