Video: भांडखोर पत्नीपासून वाचव देवा; पत्नी पीडितांचे वट पौर्णिमेपूर्वी देवाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 07:06 PM2023-06-02T19:06:57+5:302023-06-02T19:09:20+5:30

करोडी पत्नी पीडित आश्रम आगळी-वेगळी पिंपळ पौर्णिमा

Video: Save God from quarrelsome wife; demand by the victim of wife's tease | Video: भांडखोर पत्नीपासून वाचव देवा; पत्नी पीडितांचे वट पौर्णिमेपूर्वी देवाला साकडे

Video: भांडखोर पत्नीपासून वाचव देवा; पत्नी पीडितांचे वट पौर्णिमेपूर्वी देवाला साकडे

googlenewsNext

वाळूज महानगर : भांडखोर पत्नीमुळे संसार उघड्यावर पडलेल्या पत्नी पीडितांनी आज शुक्रवार (दि.२) करोडी येथील आश्रमात आगळी-वेगळी पौर्णिमा साजरी केली. या प्रसंगी पत्नी पिडीतांनी पिंपळाची पुजा करुन व प्रदक्षिणा मारत भांडखोर पत्नीपासून वाचविण्यासाठी देवाला साकडे घातले.

देशात बहुताश कायदे महिलांच्या बाजुने असल्यामुळे अनेक महिला या कायद्याचा दुरोपयोग करुन किरकोळ कारणावरुन आपल्या पतीसोबतच त्याच्या कुटुंबियाविरुध्द तक्रारी करतात. या तक्रारीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पत्नी पीडितांना सावरण्यासाठी अ‍ॅड.भारत फुलारे यांनी करोडीत ६ वर्षापुर्वी आश्रम उभारला आहे. आजघडीला या आश्रमात देशभरातील जवळपास १० हजार २०० पत्नी पिडीतांनी नोंदणी केलेली आहे. या आश्रमात प्रत्येक रविवारी पत्नी पीडितांचा दरबार भरवून  अ‍ॅड.फुलारे हे समुपदेशन करुन पत्नी पीडितांना कायदेशिर मार्गदर्शन करण्यात येते. दरवर्षी पत्नी पीडितांच्यावतीने करोडीतील आश्रमात वट पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. आज शुक्रवारी येथील आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली.

यावेळी पत्नी पीडितांनी विविध घोषणा देत पिंपळाच्या झाडाला १२१ उलट्या प्रदक्षिणा मारत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरा करण्यात आली. या प्रसंगी पत्नी पीडितांना भांडखोर पत्नीपासून पतीला वाचविण्यासाठी देवाला साकडे घालत प्रार्थना केली. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, संजय भांड, प्रविण कांबळे, भिकन चंदन, अ‍ॅड. अमोल घुगे, अ‍ॅड. अमोल होनमाने, श्रीराम तांगडे आदी पत्नी पीडितांची उपस्थिती होती.

महिलासाठी असलेल्या एकतर्फी कायद्यावर बंदीची मागणी
या अनोळख्या आंदोलनानंतर पत्नी पीडितांच्यावतीने अ‍ॅड. भारत फुलारे यांनी महिलांसाठी असलेल्या एकतर्फी कायद्यावर बंदी घालण्याची मागणी केली. प्रत्येक पोलिस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, कौटंबिक वाद न्यायालयात गेल्यास एक वर्षाच्या आत प्रकरणी निकाली काढण्यात यावे आदी मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याचे अ‍ॅड.फुलारे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

Web Title: Video: Save God from quarrelsome wife; demand by the victim of wife's tease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.