Video: भटक्या श्वानाची चाकूने भोसकून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

By साहेबराव हिवराळे | Published: April 29, 2023 06:01 PM2023-04-29T18:01:51+5:302023-04-29T18:16:09+5:30

श्वानाची हत्या करणाऱ्या माथेफिरूच्या अटकेची मागणी प्राणिमित्रांनी केली आहे

Video: Stray dog stabbed to death; Outrageous incident in Chhatrapati Sambhajinagar | Video: भटक्या श्वानाची चाकूने भोसकून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Video: भटक्या श्वानाची चाकूने भोसकून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्याकडेला शांतपणे उभा असलेल्या एका श्वानाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार मंगळवारी रात्री १ वाजता घडल्याची माहिती आहे. 

हल्ली भटक्या श्वानास दगड मारणे, हाकलून देणे असे प्रकार वाढले आहेत. अन्नाच्या शोधात श्वान रस्त्यावर भटकताना अनेक भागांत दिसून येतात. फार कमीवेळा असे श्वान स्वत:हून हल्ला केल्याचा प्रकार शहरात घडले आहेत. मात्र, रस्त्याच्या कडेला उभा श्वानावर एका माथेफिरूने धारदार चाकूने हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे माथेफिरू श्वानाची हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्ह्याराल झाला आहे. दुसऱ्या दिवशी श्वान रस्त्याच्या कडेस मृत आढळून आल्याने पेट लव्हर्समधून संताप व्यक्त करण्यात आला. 

अगदी शांत डोक्याने या युवकाने श्वानावर चाकूचे वार करून ठार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या माथेफिरू युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उस्मानपुरा भागातील प्राणीमित्रांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अकोला येथे घडली होती. त्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

शिक्षा झालीच पाहिजे...
शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना वारंवार होत असल्याने चिंतेचे वातावरण असल्याचे मत डॉ. अमित परदेशी यांनी व्यक्त केले आहे. तर अशा माठेफिरुंवर तत्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी लाईफ केअर संस्थेचे धनराज शिंदे, जयेश शिंदे यांनी केली आहे. 

Web Title: Video: Stray dog stabbed to death; Outrageous incident in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.