पैठण तालुक्यात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:43 PM2018-01-11T23:43:37+5:302018-01-11T23:43:43+5:30
तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकºयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी रात्री एकट्याने फिरू नये, असे आवाहन वन विभागाने केले असून आगर नांदूर व आपेगाव परिसरात याबाबत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.
पैठण : तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकºयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी रात्री एकट्याने फिरू नये, असे आवाहन वन विभागाने केले असून आगर नांदूर व आपेगाव परिसरात याबाबत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.
आपेगाव येथील शेतकरी गणेश औटे हे शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील ऊसात चक्क बिबट्या बसलेला दिसून आला. ते ताबडतोब शेतातील इतरांना याबाबत कल्पना देऊन गावात परतले व त्यांनी पोलीस पाटील व पैठण पोलीस ठाण्यात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी वनपाल सुधीर धवन, वनपाल गोविंद वैद्य, जी. आर. पंडित, यु. म. जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली.