रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता, मराठवाडा एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:58 PM2022-07-14T12:58:23+5:302022-07-14T13:01:30+5:30

ही रेल्वे औरंगाबाद स्टेशनवर दाखल होत असताना एसी बोगीतून आवाज येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

Vigilance of railway employees, accident of Marathwada Express was avoided | रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता, मराठवाडा एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता, मराठवाडा एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
धर्माबाद - मनमाड मराठवाडा एक्सप्रेसच्या एसी बोगीत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे ही बोगी रेल्वेपासून वेगळी करावी लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळीच लक्षात आल्याने मोठा अपघात टळला.

ही रेल्वे औरंगाबाद स्टेशनवर दाखल होत असताना एसी बोगीतून आवाज येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हा ही रेल्वे पुढे जाण्यापासून थांबविण्यात आली. सर्व तपासणी झाल्यानंतर ही बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्यात ही रेल्वे एक तास स्टेशनवरच थांबवली. बोगी वेगळी केल्यानंतर ही रेल्वे पुढे रवाना करण्यात आली. हा बिघाड वेळीच लक्षात आलं नसता तर अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Vigilance of railway employees, accident of Marathwada Express was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.