दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 08:51 PM2018-11-02T20:51:59+5:302018-11-02T20:52:44+5:30
वाळूज महानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने शुक्रवारी वाळूज एमआयडीसीतील मसिआ सभागृहात दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी केले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, फौजदार लक्ष्मण उंबरे, माणिक चौधरी, राहुल रोडे उपस्थित होते.
वर्षाराणी पाटील म्हणाल्या की, लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा असून शासकीय-निमशासकीय कार्यलय तसेच लोकसेवकाकडून लाच घेण्याचे प्रकार वाढत आहेत. लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व लोकसेवकांविरुध्द तक्रार करण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य राजेश साळे, बाळासाहेब राऊत, पोपट हांडे, सचिन गरड, परमेश्वर मदन, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, सहायक फौजदार राजु मोरे, पोहेकॉ.रामदास गाडेकर,पोना.संजय हंबीर आदीसह बजाजनगर, पंढरपूर, वडगाव, सिडको वाळूजमहानगर आदी भागातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.