शंभर वर्षापुर्वीचे झाड वाचविण्यासाठी एकवटले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:03 AM2021-05-22T04:03:52+5:302021-05-22T04:03:52+5:30
खुलताबाद : सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी मारामार सुरू आहे. परंतु, वृक्ष तोड अजुनही थांबलेली नसल्याचे चित्र आहे. ...
खुलताबाद : सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी मारामार सुरू आहे. परंतु, वृक्ष तोड अजुनही थांबलेली नसल्याचे चित्र आहे. पण कसाबखेड्यात एका शंभर वर्षापूर्वीच्या चिंचेच्या झाडाला आग लागली होती. ती अटोक्यात आणण्यासाठी शुक्रवारी गावकऱ्यांनी सामुहिक प्रयत्न केल्याने संबंधित झाड डैलाने उभे आहेत. इतका मोठा अघात होऊन सुद्धा हे चिंचेचे झाड आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
तालुक्यातील कसाबखेडा येथील मुख्य बाजारपेठेतील चिंचेच्या झाडाला अचानक रात्री आग लागली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर शुक्रवारी सकाळी ही आग अग्निशमन दलाच्या मदतीने अटोक्यात आणल्याने पुढील दुर्घटना टळली. कसाबखेडा गाव व परिसरात अनेक वर्षांपासून चिंचेची हजारो महाकाय झाडे असून गावात चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. गावातील रिक्षा स्टँडजवळील शंभर वर्षांपूर्वीच्या चिंचेच्या झाडाला मोहोळ होता. बुधवारी काही नागरिकांनी शेणाच्या गोवरीच्या धुराने झाडावरील मोहोळ (मध) काढला. परंतु हे झाड जुने असल्याने ते मधून पोकळ होते. त्यामुळे आग लागलेल्या गोवऱ्यांमुळे झाडाने बुधवारी आतून पेट घेतला होता. हे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने आठ ते दहा पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणली. परंतु, झाडात कुठेतरी आग धुमसत असल्याने गुरुवारी मध्यरात्री त्याच उभ्या झाडाने पुन्हा पेट घेतला. संबंधित घटना शुक्रवारी पहाटे ग्रामस्थांच्या लक्ष्यात येताच त्यांनी आरडाओरडा करून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. शेवटी सकाळी औरंगाबाद अग्निशमन दलास पाचारण केल्यानंतर साडेसात वाजता ही आग आटोक्यात आली.
------ नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न ------
कसाबखेड्यात चिंचेचे हजारो झाडे असून बहुतांश नागिरकांना यातून व्यवसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावात चिंचेच्या झाडाला एक वेगळेच महत्व असून त्याची अनुभूती गेल्या दोन दिवसात आली. एक झाड वाचविण्यासाठी गावातील शेकडो नागरिकांची जीव कासावित होत हे महत्वाचे आहे. दुसरीकडे डोळ्यादेखत अनेक वृक्षांची कत्तल होत असताना त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांची कमी नाही. पण कसाबखेड्यातील उपसरपंच तनवीर पटेल, पोलीसपाटील संतोष सातदिवे, चंद्रकांत राहणे यांच्यासह नागरिकांनी एक झाड वाचिण्यासाठी घेतले प्रयत्न महत्वाचे ठरल्याने संबंधित झाड इतका मोठा अघात होऊन सुद्धा समर्थपणे उभे आहे.
--- कॅप्शन :
कसाबखेड्यातील चिंचेच्या झाडास अशी आग लागलेली होती.
210521\21_2_abd_24_21052021_1.jpg~210521\21_2_abd_23_21052021_1.jpg
कसड्खेड्यातील झाडास लागलेली आग.~कसड्खेड्यातील झाडास लागलेली आग.