सप्टेंबरमध्ये गावपुढाऱ्यांच्या निवडी

By Admin | Published: August 27, 2015 12:02 AM2015-08-27T00:02:16+5:302015-08-27T00:02:16+5:30

कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल निघतो न निघतो तोच आता सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला आहे.

Village selection in September | सप्टेंबरमध्ये गावपुढाऱ्यांच्या निवडी

सप्टेंबरमध्ये गावपुढाऱ्यांच्या निवडी

googlenewsNext


कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल निघतो न निघतो तोच आता सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला आहे. तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतच्या ‘कारभाऱ्याची’ आगामी १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत निवड करण्यात येणार आहे. यासाठी आतापासूनच काही गावात ‘लॉबींग’ सुरु झाल्या आहेत.
कळंब तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीपैकी ५७ ग्रामपंचायतची ४ आॅगस्टला निवडणूक पार पडली होती. ६ आॅगस्टला मतमोजणी होवून निकाल घोषीत करण्यात आला होता. येरमाळा, मंगरुळ यासारख्या मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतचा या टप्प्यात समावेश असल्याने अनेक गावात बहुरंगी लढती झाल्या होत्या. ५७ ग्रामपंचायतच्या १८२ प्रभागातील ४८१ सदस्यासाठी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील ८५, अनुसूचित जमातीमधील २, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून १२५ तर सर्वसाधारण प्रवर्गातून २६७ सदस्य निवडले गेले होते. विजयी जल्लोषासाठी व पराभवाची कारणे शोधणारी मने स्थिरावतात न स्थिरावतात तोच आता अपेक्षित असा सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबरला भाटशिरपुरा, आडसूळवाडी, आढळा, वाणेवाडी, वडगाव (शि), बारातेवाडी, रायगव्हाण, देवधानोरा, भाटसांगवी, घारगाव ग्रा.पं. च्या १४ सप्टेंबरला ताडगाव, रांजणी, ईटकूर, शिंगोली, चोराखळी, येरमाळा, उमरा, परतापूर, वाकडी (इ), १७ सप्टेंबरला हावरगाव, पाथर्डी, पिंपळगाव (डो), भोगजी, हळदगाव, भोसा, मलकापूर, पानगाव, देवळाली, दूधाळवाडी, लासरा, एकुरका, १८ सप्टेंबर रोजी सापनाई, जायफळ, २१ रोजी कन्हेरवाडी, आथर्डी, मंगरुळ, बहुला, दहिफळ, शेलगाव (दि), उपळाई, बांगरवाडी, माळकरंजा, पाडोळी, गंभीरवाडी, २२ रोजी बरमाचीवाड, पिंप्री (शि), २३ रोजी नायगाव, बोरगाव (ध), २५ रोजी खोंदला, सौंदणा ढोकी व २६ रोजी वडगाव (ज) येथील सरपंचाच्या निवडी होणार आहेत. (वार्ताहर)
सरपंच निवडीचा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालणार असून, प्रत्येक ग्रा.पं. साठी स्वतंत्र अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ५७ ग्रा.पं. पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रर्गासाठी १० तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३२ ग्रा.पं. चे सरपंचपद आरक्षित झाले आहेत. यातील पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव झाले आहेत. यापैकी ईटकूर, येरमाळा या मोठ्या ग्रा.पं. सर्वसाधारणासाठी तर मंगरुळ, नायगाव, रांजणी, दहिफळ, कन्हेरवाडी, पाडोळी, चोराखळी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत.

Web Title: Village selection in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.