अभियंत्यावर कारवाईसाठी ग्रामस्थांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:37+5:302021-09-24T04:04:37+5:30
औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष कचरू डिके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवराई, परसोडा, सवंदगाव, गोलवाडी, दहेगाव, करंजगाव, पालखेड, ...
औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष कचरू डिके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवराई, परसोडा, सवंदगाव, गोलवाडी, दहेगाव, करंजगाव, पालखेड, लासुरगाव, कनकसागज, तिडी, बेंदवाडी या गावांतील नागरिकांनी सहभाग घेतला होता. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये बेलगांव ते लासूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरण कामावर सुमारे ३२ कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे; मात्र हा रस्ता दोन महिन्यांतच खराब झाला. या रस्त्यावर पाच ते सात फूट खोल खड्डे पडले असून, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावर ३२ कोटी रुपये एवढा मोठा खर्च करूनही काम निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.