लसीकरणासाठी आग्रही गावकऱ्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:05 AM2021-04-25T04:05:06+5:302021-04-25T04:05:06+5:30
--- औरंगाबाद : गावागावातून कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यासाठी गावकऱ्यांसह लोकप्रतिनीधींकडून मागणी होतेय. आधी लसीकरणाला अनुत्सुक असलेल्या ...
---
औरंगाबाद : गावागावातून कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यासाठी गावकऱ्यांसह लोकप्रतिनीधींकडून मागणी होतेय. आधी लसीकरणाला अनुत्सुक असलेल्या गावांतही लसीकरणासाठी आता आग्रह होतोय. मात्र, शहराच्या तुलनेत ग्रामीणची लोकसंख्या अधिक असूनही ग्रामीण भागाला लसींची मात्रा कमीच मिळत असल्याने लस घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड होत आहे. त्यात केवळ एकच दिवसाच्या लसीचा साठा शिल्लक असल्याने लसीच्या पुरवठ्याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि ४५ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणासाठी उद्दिष्ट ९ लाख ५ हजार ३६१ जणांचे आहे. त्यापैकी केवळ १ लाख ७२ हजार ६१८ जणांनी पहिला, तर दुसरा डोस १३ हजार ७१३ जणांनी घेतला, अशी एकूण १ लाख ८६ हजार ३३१ जणांचे लसीकरण आतापर्यंत होऊ शकले. आता २९२२ लस उरल्या आहेत. त्यात एकाच दिवसाचे लसीकरण होऊ शकेल. त्यामुळे लसींचा आवश्यक साठा मिळण्याची गरज आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागातून व्यक्त होत आहे.
--
ग्रामीण भागातून आग्रह होतोय. मात्र, लसींचा पुरवठा करण्याचे सूत्र राज्य शासन ठरवते. त्यानुसार पुरवठा होत आहे. अधिक लसींचा पुरवठा झाल्यास ग्रामीणमध्ये लसीकरणाला अधिक गती देता येईल.
-डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी.
---
तालुका - पहिला डोस -दुसरा डोस - शिल्लक लस
वैजापूर -२३५४१ -२५४४ -९८०
सिल्लोड -१९,४९४ -१४९५ -००
पैठण-२४,८८४ -१८४२ -७२२
गंगापूर - २४,४९६ -१३१९ -५७०
खुलताबाद-७,९८८ -९६१ -१०
कन्नड- २५,७७० -२३६१ -१७०
फुलंब्री - ११,११७ -९३७ -२२०
औरंगाबाद-२६,१३६ -१९२५ -१००
सोयगाव - ९१९२ -३२९ -१५०