कोरोना चाचणीच्या भीतीने ग्रामस्थांची लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:04 AM2021-03-26T04:04:32+5:302021-03-26T04:04:32+5:30
येथील आरोग्य केंद्रात ४५ वर्षांपुढील नागरिकांना व कोरोनायोद्ध्यांना कोविड लसीकरण केले जात आहे. परंतु लस घेण्यासाठी आलेल्या वयस्कर ग्रामस्थांचा ...
येथील आरोग्य केंद्रात ४५ वर्षांपुढील नागरिकांना व कोरोनायोद्ध्यांना कोविड लसीकरण केले जात आहे. परंतु लस घेण्यासाठी आलेल्या वयस्कर ग्रामस्थांचा स्वॅब तपासणी पाठविण्यात आला. यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातच कंपनीत काम करीत असलेल्या दोन जणांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र लागत होते. म्हणून त्यांनी तपासणी केली असता त्यांचादेखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. एकाच दिवशी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले, तर लस घेण्यासाठी जायचे अन् कोरोना पॉझिटिव्ह व्हायचे, या धास्तीने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे.
लसीकरणासाठी आलेल्या सर्व रुग्णांची आम्ही कोरोना चाचणी करत नाही. परंतु काही आजार असल्यास किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण करावे. - डॉ. वैशाली डकले पाटील, वैद्यकीय अधिकारी