विनायक मेटे आणि मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही
By Admin | Published: September 15, 2016 12:30 AM2016-09-15T00:30:59+5:302016-09-15T00:36:28+5:30
औरंगाबाद : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादेतील विविध दहा ते बारा संघटनांनी एकत्र येऊन के ली. त्यानंतर राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत.
औरंगाबाद : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादेतील विविध दहा ते बारा संघटनांनी एकत्र येऊन के ली. त्यानंतर राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत. मराठा मोर्चाचे नेतृत्व नेते नव्हे तर समाजबांधव करीत आहेत. मराठा मोर्चासंबंधी आ. विनायक मेटे हे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा क्रांती मोर्चाशी आ. मेटे यांचा कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. शिवानंद भानुसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
प्रा.भानुसे म्हणाले की, कोपर्डीमध्ये शाळकरी मुलीवरील अत्याचार आणि हत्या, मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे, जिजाऊंची बदनामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ९५ टक्के गरीब मराठा समाज, उपेक्षितांचा समाजातील पाच टक्के प्रस्थापितांविरोधातील रोष इ. मुद्दे मराठा क्रांती मोर्चासमोर आहेत. मराठा क्रांती मोर्चाची धगधग कायम असून, मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादेतील विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊ न केली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरमेटे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या मोर्चासंदर्भात श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक मेटे आणि मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही. मेटे हे यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारसोबत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज आणि संघटना (पान २ वर)