विन्टोजेनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन : औरंगाबादमध्ये १६ डिसेंबरला रंगणार थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 07:17 PM2018-11-27T19:17:48+5:302018-11-27T19:22:27+5:30
संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे.
औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. यंदा विन्टोजेनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉनचा थरार औरंगाबादला १६ डिसेंबर रोजी रंगणार आहे.
लोकप्रियतेचे मैलाचे दगड पार करणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो धावपटू तासन्तास मैदानावर घाम गाळत आहेत. विशेष म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करण्यासाठी राज्यभरातील धावपटू, प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि उदयोन्मुख खेळाडूंत चुरस वाढली आहे. गतवर्षी ऐतिहासिक औरंगाबादेत आयोजित महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळाला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया धावपटूंमध्ये होती.
यंदाची महामॅरेथॉनदेखील आणखी दर्जेदार ठरेल, असा विश्वास धावपटूंत आहे. या महामॅरेथॉनची तयारी करणाऱ्या धावपटूंनी विविध शहरांतील रस्ते फुलून गेले आहेत. अशीच अवस्था राज्यभरातील मैदानांवर आहे. मैदानावर भल्या पहाटे हजारे धावपटू कसून सराव करीत असल्याचे चित्र आहे. नागरिक तंदुरुस्त राहावेत या हेतूने आयोजित ही महामॅरेथॉन ‘फन रन’ (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १0 कि.मी.ची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ कि. मी. (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वांसाठी खुली असेल. त्याचप्रमाणे लष्करातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवण्यात आला आहे.
नावनोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक
सीझन २ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार... लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉन सीझन ३ साठी आजच नाव नोंदणी करा.
संपर्क :
या महामॅरेथॉनमध्ये नाव नोंदविण्यास धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह आहे. धावपटूंना आपल्या नावाची नावनोंदणी आपापल्या शहरातील लोकमत कार्यालयात करता येईल. अधिक माहिती www.mahamarathon.com या संकेतस्थळावर व 9130239424 या क्रमांकावर मिळेल.