कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला 95 हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 03:52 PM2022-01-13T15:52:16+5:302022-01-13T15:53:52+5:30

शहरात कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरेल असा अंदाज वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला आहे

Violation of corona regulations; Four coaching classes in Nanded fined Rs 95,000 | कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला 95 हजार रुपयांचा दंड

कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला 95 हजार रुपयांचा दंड

googlenewsNext

नांदेड- कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला तब्बल 95 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिकेच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी केली. 

नांदेड शहरात कोरोणाचा बुधवारी उद्रेक झाला होता. एकाच दिवशी 474 रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरेल असा अंदाज वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला आहे. नांदेडमध्ये बुधवारी एकाच दिवशी 474 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने 12 जानेवारीपासून शहरात कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी तेरा पथके कार्यान्वित केले आहेत. या पथकाने गुरुवारी शहरातील कोचिंग क्लासेसला भेटी दिल्या. यावेळी कोचिंग क्लासेस मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आढळले. अनेक विद्यार्थ्यांना मास्कही नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या या पथकाने कोचिंग क्लासेसच्या संचालकांना दंड ठोठावला आहे. 

यामध्ये यामध्ये सर्वाधिक दंड आरसीसी क्लासेस ला ठोठावला आहे. पन्नास हजार रुपये दंड आकारणी करण्यात आली आहे. शांभवी क्लासेस ला 25 हजार, दरक कोचिंग क्लासेसला १० हजार रुपये आणि सलगरे कोचिंग क्लासेसला दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे यापुढेही शहरात अशीच कारवाई सुरू राहील असे उपायुक्त संधु यांनी सांगितले.

Web Title: Violation of corona regulations; Four coaching classes in Nanded fined Rs 95,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.