औरंगाबादच्या कचरा प्रश्नाला हिंसक वळण, मिटमिटा येथे जमावाने दोन कचरा गाड्या पेटवल्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:39 PM2018-03-07T16:39:13+5:302018-03-07T17:24:04+5:30

शहरातील कचर्‍याचा प्रश्नाने आज हिंसक वळण घेतले. नारेगाव येथे कचराकोंडी झाल्याने मनपातर्फे तात्पुरत्या स्वरुपात मिटमिट येथे कचरा टाकण्यात येणार होता. याला विरोध करत जमावाने कचरा टाकण्यात आलेल्या दोन गाड्यांवर दगडफेक करत त्या पेटवून दिल्या. 

Violent turn of Aurangabad's trash question, Mittimita mob sets two garbage cars | औरंगाबादच्या कचरा प्रश्नाला हिंसक वळण, मिटमिटा येथे जमावाने दोन कचरा गाड्या पेटवल्या  

औरंगाबादच्या कचरा प्रश्नाला हिंसक वळण, मिटमिटा येथे जमावाने दोन कचरा गाड्या पेटवल्या  

googlenewsNext

औरंगाबाद: शहरातील कचर्‍याचा प्रश्नाने आज हिंसक वळण घेतले. नारेगाव येथे कचराकोंडी झाल्याने मनपातर्फे तात्पुरत्या स्वरुपात मिटमिट येथे कचरा टाकण्यात येणार होता. याला विरोध करत जमावाने कचरा टाकण्यात आलेल्या दोन गाड्यांवर दगडफेक करत त्या पेटवून दिल्या. 

शहरातील कचराकोंडीचा आजचा २० वा दिवस आहे. शहरात सध्या साचलेल्या कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी मिटमिटा येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सफारी पार्कसाठी राखीव १०० एकर जागेपैकी ५ एकर जागा शासनाने (जिल्हाधिकार्‍यांनी) महापालिकेला दिली आहे. आज या ठिकाणाची पाहणी करण्यास गेलेल्या मनपाच्या पथकाला स्थानिक नागरिकांनी अडवले होते. त्यानंतर ३.३० च्या दरम्यान मनपाच्या कचरा गाड्या पोलीस बंदोबस्तात येथे दाखल झाल्या. यावेळी कचरा टाकण्यास विरोध करणारा जमाव हिंसक झाला व त्यांनी दगडफेक करत दोन गाड्या पेटवून दिल्या. जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच पोलिसांनी अतिरिक्त कुमुक मागविण्यात आली आहे.
नागरिक,पोलीस जखमी 
जमावाच्या तुफान दगडफेकीत जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. यात १५ पोलिसांचा समावेश आहे. तसेच अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे 

Web Title: Violent turn of Aurangabad's trash question, Mittimita mob sets two garbage cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.