वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द;आयोजनासाठी कमी कालावधी असल्याने निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:15 AM2018-01-13T01:15:51+5:302018-01-13T16:52:07+5:30
९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.
औरंगाबाद : बहुचर्चित वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आला असून, आॅक्टोबर २०१८ मध्ये हा महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सूतोवाच केले. गुरुवारी ५ इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्यांसोबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांचे सादरीकरण पाहिले. तसेच महोत्सव आयोजन समिती सदस्य, जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, मनपा अधिका-यांशी चर्चा केली. आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले, शासनाकडून मिळणा-या निधीचा काही मुद्दा नाही. ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.
जिल्हाधिकारी म्हणाले...
महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एमटीडीसीचा हा महोत्सव आहे. पर्यटक येण्यासाठी सप्टेंबर ते फेबु्रवारी हा काळ असतो. फेबु्रवारीमध्ये स्थानिक नागरिकांसाठीच आयोजन केल्यासारखे होईल. विदेशी पर्यटक आल्यास महोत्सवाचे मार्केटिंग जगभर होईल. तसेच जानेवारी ते मार्च हा काळ महसूल प्रशासनासाठी वसुलीचा असतो. विभागीय यंत्रणादेखील महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी तत्पर असते. तर जिल्हा प्रशासनावरही तीच कामे असतात. त्यामुळे चांगले नियोजन करून हा महोत्सव घेण्याचे ठरले आहे.