विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘माझा विठ्ठल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:43 AM2017-10-28T00:43:01+5:302017-10-28T00:43:22+5:30
कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगांपासून उभा असलेला विठ्ठल, चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला वारक-यांचा विठुराय, अशी विठ्ठलाची विविध रूपे बालकांनी मोठ्या सर्जनशीलतेने कागदावर चितारली आणि ‘स्टार प्रवाह’ व ‘लोकमत’ यांच्यातर्फे आयोजित ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगांपासून उभा असलेला विठ्ठल, चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला वारक-यांचा विठुराय, अशी विठ्ठलाची विविध रूपे बालकांनी मोठ्या सर्जनशीलतेने कागदावर चितारली आणि ‘स्टार प्रवाह’ व ‘लोकमत’ यांच्यातर्फे आयोजित ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.
स्पर्धेदरम्यान शहरातील हजारो शाळकरी विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून विठू माऊलीचे रूप कॅनव्हासवर उतरत गेले. दि. ३० आॅक्टोबर रोजी स्टार प्रवाहवर सायंकाळी ७ वा. ‘विठू माऊली’ मालिकेच्या पहिल्या भागात विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत आणि पारितोषिक प्राप्त चित्रेही दाखविली जाणार आहेत.
स्टार प्रवाहवर दि. ३० आॅक्टोबरपासून दररोज सायं. ७ वा. विठू माऊली ही नवी मालिका दाखल होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या अवताराची कहाणी या मालिकेत पाहायला मिळेल. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली ही मालिका अतिशय भव्यदिव्य आणि नेत्रदीपक आहे. या मालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात मोठी उत्सुकता असून मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या १२ शहरांतील प्रत्येकी १२ शाळांमध्ये म्हणजेच एकूण १४४ शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या मनातल्या विठ्ठलाला कॅनव्हासवर चितारले. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चित्र वेगळे आणि अनोखे आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. ‘माझा विठ्ठल’ या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड असून, प्रत्येक विद्यार्थ्याचे चित्र खास आहे. त्यामुळे एक लाखाहून अधिक चित्रांतून विजेते निवडणे मोठे आव्हान होते, असे परीक्षकांनी सांगितले.
‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन दि. २९ आॅक्टोबर रोजी प्रोझोन मॉल येथे स. १० ते रात्री ८ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रत्यक्ष पाहता येतील. तेव्हा या प्रदर्शनालाही आवर्जून भेट द्या आणि दि. ३० आॅक्टोबर रोजी स्टार प्रवाहवर सायं. ७ वा. स्पर्धेतील विजेते आणि ‘विठू माऊली’ ही मालिका पाहायला विसरू नका.