दीड वर्षानंतर बहिणींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:02 AM2021-03-16T04:02:16+5:302021-03-16T04:02:16+5:30
ट्विंकल खन्नाने कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत. कुटुंबीयांसोबत मजामस्ती करतानाच्या या फोटोंनी साऱ्यांचे ...
ट्विंकल खन्नाने कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत. कुटुंबीयांसोबत मजामस्ती करतानाच्या या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यामधील एका फोटोत अक्षयची मेहुणी आणि ट्विंकलची बहीण दिसत आहे. ट्विंकल सोबत तिची बहीण रिंकी खन्ना मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘या सुट्ट्यांमधील सर्वात सुंदर भाग. जवळपास दीड वर्षांनंतर मी माझ्या बहिणीला भेटले. गेल्या काही दिवसांपासून आमची भेट झाली नव्हती’ या आशयाचे कॅप्शन ट्विंकलने दिले आहे.
सुहाना खानने शेअर केला बोल्ड लूक
बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. सुहाना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सध्या सोशल मीडियावर सुहानाच्या बोल्ड लूकची चर्चा सुरू आहे. नुकताच सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहे. पण सर्वात जास्त चर्चा या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाच्या रंगल्या आहेत. हा मिस्ट्री बॉय कोण आहे ज्याच्यासोबत सुहाना पोज देत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण तो मुलगा कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बिपाशा बासू प्रेग्नंट आहे ?
बिपाशा आणि करण काही दिवसांपूर्वी मालदिवला व्हेकेशनसाठी गेले होते. तिथून त्यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो पाहून बिपाशा गरोदर आहे का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. सोशल मीडियाद्वारे अनेकजण याविषयी विचारत होते. एवढेच नव्हे तर यावरून बिपाशा आणि करण यांना ट्रोल देखील केले जात होते. सुरुवातीला या दोघांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता करणने एका मुलाखतीत बिपाशा गरोदर नाही असा खुलासा केला आहे. यादरम्यान तो सोशल मीडियावरील ट्रोलर्सवर प्रचंड भडकला असल्याचे दिसून आले. तो म्हणाला की, ट्रोलर्सला शक्य झालं तर ते मी देखील गरोदर आहे असे म्हणतील. माझ्या देखील चेहऱ्यावर त्यांना प्रेग्नंसी ग्लो दिसेल...