महापौर चीन दौऱ्यावर; सेनेकडून सभा घेण्याच्या हालचाली

By Admin | Published: July 11, 2017 12:29 AM2017-07-11T00:29:03+5:302017-07-11T00:29:29+5:30

औरंगाबाद : राज्य शासनाकडून १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी प्राप्त होताच महापालिकेच्या राजकीय आखाड्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

Visitor to China; Mobilizing movements | महापौर चीन दौऱ्यावर; सेनेकडून सभा घेण्याच्या हालचाली

महापौर चीन दौऱ्यावर; सेनेकडून सभा घेण्याच्या हालचाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य शासनाकडून १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी प्राप्त होताच महापालिकेच्या राजकीय आखाड्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. निधी आणण्याचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप करीत सेनेने शुक्रवारी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला. त्यानंतर आता महापौर बापू घडामोडे चीन दौऱ्यावर रवाना होताच विशेष सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली सेनेने सुरू केल्या आहेत. उपमहापौर स्मिता घोगरे यांना महापौरांच्या जागेवर बसवून ही सभा घेण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने कायदेशीर चाचपणी सोमवारी करण्यात येत होती.
शुक्रवार, ७ जुलै रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत १०० कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या निमित्ताने महापौर बापू घडामोडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आले. याचा राग धरून सेनेने चक्क सर्वसाधारण सभेवरच बहिष्कार घातला. सेनेपाठोपाठ एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी १०० कोटींतील रस्त्यांची यादी जाहीर करा, चीन दौरा रद्द करा, आदी मागण्यांसाठी महापौरांसमोरील राजदंड पळविला. त्यानंतर सभेवर बहिष्कार घातला.
भाजपने दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोबत घेऊन सभा चालविली. सेना, एमआयएमचा बहिष्कार असला तरी सभा चालू शकते, असे दाखविण्याचा प्रयत्न भाजपने केला. भाजपच्या या कृतीला उत्तर देण्यासाठी सोमवारी सेनेचे पदाधिकारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबत विचारविनिमय करीत होते.

Web Title: Visitor to China; Mobilizing movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.