विठू विठू नामाचा जयघोष..!

By Admin | Published: July 16, 2016 12:56 AM2016-07-16T00:56:28+5:302016-07-16T01:09:04+5:30

जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला.

Vithu Vithu Namahosh ..! | विठू विठू नामाचा जयघोष..!

विठू विठू नामाचा जयघोष..!

googlenewsNext

जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवसभर लाखो भाविकांनी शिस्तबद्ध आणि रांगेतून शांततेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या दिवशी जालना शहरात अवघी पंढरीच अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी अपूर्व उत्साहात पार पडली. शहरातील जुना जालन्यात असणाऱ्या आनंदीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरती झाल्यानंतर सकाळी आनंदीस्वामी यांची पालखी मंदिरापासून निघाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला होता.
भाळी अष्टगंध, गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल, विठ्ठल नाव लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रूमाल, झेंडे, पताके लेझिम, बँड पथक, हालगी पथक, दांडपट्टा यामुळे पालखी मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
आनंदीस्वामी मंदिरापासून निघालेली ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदीस्वामी मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुस्लिम समाजाची
२८ वर्षांची परंपरा
एकतेचा संदेश : पालखीचे स्वागत, वारकऱ्यांचा सत्कार
जालना : हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई... हम सभ है भाई भाई... या ओळींचा प्रत्यय शुक्रवारी जालना शहरातील जामा मस्जीदसमोर आला. मुस्लीम समाज बांधवांकडून आनंदीस्वामींच्या पालखीचे स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २८ वर्षांची परंपरा आजही कायम असून यातून एकतेचा संदेश देण्यात येतो.
‘भज गोविंदम भज गोपाला...’ असा जयघोष करीत आनंदीस्वामींची पालखी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जामा मस्जीदसमोर आली. येथे मुस्लीम समाजाच्यावतीने स्वागत करण्याची २८ वर्षांपासूनची परंपरा आहे. शुक्रवारीही समाजाच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, सोहेल खान, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पवार, शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, शेख मेहमूद, शेख अख्तर अहेमद यांची प्रमुख उपस्थित होते. स्वागत, सत्कार कार्यक्रमानंतर ही पालखी गांधी चमन परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. सय्यद जावेद अली, जब्बार खान, शेख जावेद, शेख निजाम, शेख जब्बार, शेख जमील, अमजद खान, लईक शेख, शेख अजहर, शफी अहेमद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.नामाचा जयघोष..!
जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवसभर लाखो भाविकांनी शिस्तबद्ध आणि रांगेतून शांततेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या दिवशी जालना शहरात अवघी पंढरीच अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी अपूर्व उत्साहात पार पडली. शहरातील जुना जालन्यात असणाऱ्या आनंदीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरती झाल्यानंतर सकाळी आनंदीस्वामी यांची पालखी मंदिरापासून निघाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला होता.
भाळी अष्टगंध, गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल, विठ्ठल नाव लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रूमाल, झेंडे, पताके लेझिम, बँड पथक, हालगी पथक, दांडपट्टा यामुळे पालखी मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
आनंदीस्वामी मंदिरापासून निघालेली ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदीस्वामी मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुस्लिम समाजाची
२८ वर्षांची परंपरा
एकतेचा संदेश : पालखीचे स्वागत, वारकऱ्यांचा सत्कार
जालना : हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई... हम सभ है भाई भाई... या ओळींचा प्रत्यय शुक्रवारी जालना शहरातील जामा मस्जीदसमोर आला. मुस्लीम समाज बांधवांकडून आनंदीस्वामींच्या पालखीचे स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २८ वर्षांची परंपरा आजही कायम असून यातून एकतेचा संदेश देण्यात येतो.
‘भज गोविंदम भज गोपाला...’ असा जयघोष करीत आनंदीस्वामींची पालखी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जामा मस्जीदसमोर आली. येथे मुस्लीम समाजाच्यावतीने स्वागत करण्याची २८ वर्षांपासूनची परंपरा आहे. शुक्रवारीही समाजाच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, सोहेल खान, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पवार, शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, शेख मेहमूद, शेख अख्तर अहेमद यांची प्रमुख उपस्थित होते. स्वागत, सत्कार कार्यक्रमानंतर ही पालखी गांधी चमन परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. सय्यद जावेद अली, जब्बार खान, शेख जावेद, शेख निजाम, शेख जब्बार, शेख जमील, अमजद खान, लईक शेख, शेख अजहर, शफी अहेमद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

आषाढी एकादशिनिमित्त जालना विभागातून १२० जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी रात्री बसस्थानकांत भाविक प्रवाशांची गर्दी होती. त्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी विभागीय नियंत्रक पी.पी.भुसारी, सांख्यिकी अधिकारी कवसाडीकर, आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे, कर्मवर्ग अधिकारी घोडके, उपयंत्र अभियंता गोविंद कबाडे, विभागीय वाहतूक अधिकारी चोथमल हे जालना स्थानकात शुक्रवारी सकाळपासून ठाण मांडून होते. तसेच स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही.
पालखी मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी ठिकठिकाणी फराळाची व चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विठ्ठल मंदिर रोडवरील माळीपुरा भागात चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संजय तिडके, गणेश दुरे, मंगेश कराळे, जालिंदर वायाळ, विनोद डोरे, शिवाजी देशमुख, एकनाथ मोटे, दत्ता जगदाने आदींनी सहभाग नोंदवला. १२ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. तसेच कसबा परिसरात १० क्विंटर शाबुदान्याचे वडे भाविकांना देण्यात आले. यासह अनेक ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Vithu Vithu Namahosh ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.