औरंगाबादचे वि.ल.धारूरकर त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:14 AM2018-07-05T11:14:29+5:302018-07-05T11:16:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली.
शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात ३५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. वि.ल. धारूरकर हयांनी सुरुवातीला कोल्हापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनतर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात त्यांची निवड झाली. तीन वर्षांपूर्वी याच विभागाचे प्रमुख म्हुणुन ते निवृत्त झाले.
ठळक बाबी -
- कोल्हापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य
- माजी संचालक, अकॅडेमिक स्टाफ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
- माजी विभाग प्रमुख, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
- जेएनयु, दिल्ली येथे निवडसमितीवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य
- 'नॅक' च्या पिअर टीमचे सदस्य
- युजीसीचे इमिनीयंट प्रोफेसर फेलोशिप प्राप्त
- सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'लिबरल आर्ट्स' या विभागाच्या संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी
- विविध विषयावरील ३२ पुस्तके प्रकाशित (६ इंग्लिश, २६ मराठी)
- देश, विदेशातील चर्चा, परिसंवाद, कार्यशाळांमध्ये सहभाग
- जगभरातील नामांकीत रिसर्च जर्नलमध्ये शोध निबंध प्रकाशित
- अध्यापनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागात कार्य