विविध कार्यक्रमाद्वारे कन्नड तालुक्यात मतदार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:04 AM2021-01-14T04:04:51+5:302021-01-14T04:04:51+5:30
तालुक्यामध्ये ८० ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी पथकातर्फे ज्या गावात निवडणुका होत आहेत, त्याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध ऑनलाईन ...
तालुक्यामध्ये ८० ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी पथकातर्फे ज्या गावात निवडणुका होत आहेत, त्याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, घरासमोर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, निवडणूक मतदार जनजागृती घोषवाक्य स्पर्धा, ‘मी मतदान करणारच’ अशा संकल्प पत्राचे वाचन, तसेच विविध व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी कार्यालय कन्नडच्या या आवाहनावर तालुक्यातील सर्वच २० केंद्रांत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी या कार्यात सहभाग घेतला.
तहसीलदार संजय वारकड यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. सदरील कार्य पाहून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व तहसीलदार संजय वारकड यांनी सर्व तालुका स्वीप पथकातील सदस्यांचे अभिनंदन केले.
स्वीप पथकामध्ये गटशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षणविस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे, कलाशिक्षक सलिम आतार, योगेश पाटील, दत्तात्रय गुडलावार, स्वाती सोनवणे, इंदीरा बोरसे, राहत जबिन कादरी आदींनी उत्कृष्ट कार्य केले.