मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:43+5:302020-12-11T04:21:43+5:30

औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे मार्च २०२० ...

Voter list for March 2020 canceled | मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द

मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द

googlenewsNext

औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे मार्च २०२० मधील मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने रद्द ठरविली आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.

नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, निवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे, एप्रिल-मे २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व इतर चार पोटनिवडणुकीसाठी निर्धारित कार्यक्रमानुसार ९ मार्च २०२० रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करुन १६ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. २३ मार्च २०२० रोजी अंतिमरित्या यादी प्रसिध्द करायची होती. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यास स्थगिती देण्यात आली. १७ मार्चपासून आहे त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत स्थगिती आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२० या पात्रता दिनांकावर विधानसभा मतदार यादी अद्ययावत करुन २५ सप्टेंबर २०२० रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली आहे. दरम्यान आजवरच्या घडामोडींना पाहता नव्याने मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे २४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या आदेशान्वये दिलेला मतदार यादीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.

Web Title: Voter list for March 2020 canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.