मतदार नोंदणी; ३१ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:59 PM2017-08-03T23:59:19+5:302017-08-03T23:59:19+5:30

जिल्ह्यातील तरुण व प्रथमपात्र मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात जुलै महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Voter registration; Term upto 31 | मतदार नोंदणी; ३१ पर्यंत मुदत

मतदार नोंदणी; ३१ पर्यंत मुदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील तरुण व प्रथमपात्र मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात जुलै महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा नवमतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत १ जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मतदारांना नोंदणीसाठी अर्ज करता येतील. जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी, वगळणी व दुरुस्तीसाठीचे अर्ज ३१ आॅगस्टपर्यंत स्वीकारण्यात येतील. आपल्या भागातील बीएलओ यांच्याकडे अथवा संबंधित तहसील कार्यालयात अर्ज जमा करण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ हे त्यांच्या क्षेत्रात ३१ आॅगस्टपर्यंत घरी भेटी देतील आणि मतदारांची नोंदणी करतील. ५ जानेवारी २०१७ नंतर नोंदणी करण्यात आलेल्या तसेच दुरुस्ती करण्यात आलेल्या मतदारांना त्या-त्या बीएलओ मार्फत विनामूल्य प्लास्टीक मतदान ओळखपत्र वितरित करण्यात येत आहे. ज्या मतदारांचे फोटो यादीत नाही त्यांनी फोटो द्यावेत.

Web Title: Voter registration; Term upto 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.