मतदारांनी ‘नोटा’तून केला रोष व्यक्त

By Admin | Published: October 21, 2014 12:17 AM2014-10-21T00:17:33+5:302014-10-21T00:57:39+5:30

सोमनाथ खताळ , बीड आघाडी सरकारवर एवढ्या दिवस असलेला रोष अखेर रविवारी मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून दाखवून दिला.

The voters expressed their anger over 'Nota' | मतदारांनी ‘नोटा’तून केला रोष व्यक्त

मतदारांनी ‘नोटा’तून केला रोष व्यक्त

googlenewsNext


सोमनाथ खताळ , बीड
आघाडी सरकारवर एवढ्या दिवस असलेला रोष अखेर रविवारी मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून दाखवून दिला. जिल्ह्यातील सहा मतदार संघातून ६ हजार ४१२ मतदारांनी ‘नोटा’चा (नकाराधिकाराचा) वापर केला आहे. यामध्ये गेवराई आघाडीवर असून बीड मतदार संघात सर्वात कमी वापर केला आहे.
आघाडीतील बिघाडी आणि युतीची झालेली काडीमोड यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार होते. या सरकारकडून अपेक्षेप्रमाणे कामे झालेली नाहीत. तसेच मतदारांना सत्तापरीवर्तन हवे होते. त्यामुळे यावेळेस राष्ट्रवादी अणि काँग्रेसला मागे टाकत भाजपा च्या उमेदवारांना विजयी करण्यात मतदारांनी अधिक पसंती दिली. सहा मतदार संघातील पाच उमेदवार भाजपा चे विजयी झाले आहेत तर बीड विधानसभा मतदार संघातील राकॉ चे जयदत्त क्षीरसागर हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत.
एकीकडे प्रशासन मतदार जनजागृती कार्यक्रम घेत आहेत. तर दुसऱ्या बाजुला मतदारांचा नकाराधिकाराची मानसीकता काही केल्या कमी होत नसल्याचे दिसूनयेत आहे. तरी लोकसभा निवडणुकीपेक्षा यावर्षी कमी मतदारांनी नोटा चा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत हा आकडा १४ हजाराच्या वर होता. गेवराई, परळी, केज, आष्टीने ओलांडली हजारी
सहा मतदार संघापैकी चार मतदार संघात हजारापेक्षा अधिक मतदारांनी नोटा चा वापर केला आहे. यामध्ये गेवराईने वरच्या क्रमांकावर आहे.
का केला रोष व्यक्त?
विकास कामे व त्यांचे नियोजन, मतदारांचे रखडलेले प्रश्न, सर्वसामान्यांशी दुरावलेली नाळ, पंक्षातर्गत राजकारण याला आता जनता वैतागली होती.
गेवराई, आष्टी आणि परळीमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर करण्यात आला.
तसेच केजमध्येही चार महिला रणांगणात उतरल्या होत्या, त्यामुळे मतदार गोंधळला होता. येथे नोटा बटन दाबणाऱ्या मतदारांची संख्या १२८१ एवढी आहे.

Web Title: The voters expressed their anger over 'Nota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.