छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार ठरविण्यात मोठा वाटा राहणार तिशीतील मतदारांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 07:50 PM2024-09-05T19:50:58+5:302024-09-05T19:51:05+5:30
सर्वात कमी मतदार ८० हून अधिक वयोगटातील आहेत. ४८ हजार १०९ च्या आसपास ते मतदार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मतदारयादीचा अंतिम पुन्हा कार्यक्रम संपला आहे. नवीन यादी प्रशासनाने अपडेट केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे १० लाख २० ते ३० वयातील मतदारांचा आमदार निवडीत मोठा वाटा असणार आहे. त्या खालोखाल ३० ते ४० वयातील मतदारांचा ७ लाख महत्त्वपूर्ण आकडा आहे.
सरासरी कोणत्या वयोगटाचे किती मतदार?
वयोगट मतदार
१८-१९....२ लाख
२०-२९... १० लाख १२
३०-३९...७ लाख ३ हजार ६४२
४०-४९...५ लाख ३० हजार ३००
५०-५९...३ लाख ४३ हजार
६०-६९....२ लाख ४५ हजार ३६३
७०-७९...१ लाख २२ हजार ९८७
८०-८९...४८ हजार १०९
सर्वाधिक मतदार तिशी व चाळीशीतील
सर्वाधिक मतदार तिशीतील आहेत. दोन्ही वयोगटाचे सुमारे १७ लाख मतदार आहेत.
सर्वात कमी मतदार ८० च्या पुढील
सर्वात कमी मतदार ८० हून अधिक वयोगटातील आहेत. ४८ हजार १०९ च्या आसपास ते मतदार आहेत.
शंभरी पार केलेले ४०० मतदार
शंभरी पार केलेले ४०० च्या आसपास मतदार आहेत.
अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे
विधानसभा निवडणुकीच्या अंतिम यादीत ५३ हजार मतदार वाढले, २० हजार मतदारांची नावे वगळली. ८५ वयापेक्षा अधिक १ हजार ९९६ मतदारांची संख्या घटली. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील १४ हजार ४९ नवे मतदार यादीत आहेत. दिव्यांग मतदारांमध्ये देखील ३४१ ने वाढ झाली आहे.
-देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग