एमआयएमला भाजपच्या गडातून मते; ज्यांनी काम केले नाही त्यांची यादी भाजपकडून तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 07:46 PM2024-11-27T19:46:13+5:302024-11-27T19:47:19+5:30
भाजपने सुरू केले बूथनिहाय मतदानाचे ऑपरेशन
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पुंडलिकनगर परिसरात एमआयएमने विधानसभा निवडणुकीत दणक्यात मते घेतली. पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानननगर, नवनाथनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, भारतनगर, न्यायनगर, एन-३, एन-४ या वॉर्डातून एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मतदान झाले आहे. भाजपचे उमेदवार आ. अतुल सावे यांच्या तुलनेत जलील यांना फार कमी मते असली, तरी हिंदू मतदानाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या ऑरेंज बेल्टमध्ये एमआयएमला मतदान होणे, हे भाजपच्या पचनी पडलेले नाही.
भाजपने मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतांच्या आकड्यांचे ऑपरेशन सुरू केले असून, पक्षाच्या व इतर पक्षांतील ज्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहकार्य करूनही काम केले नाही, त्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीत त्या यादीनुसार अनेकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्याचा इशारा भाजपच्या गोटातून देण्यात आला आहे.
पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानननगर या वॉर्डातून जलील यांना सुमारे १४६७ मतदान झाले आहे. लोकसभेला या भागातून जलील यांना फक्त १४९ मते होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी ३६ मतदान केंद्रावरील आकडे पाहिले, तर एमआयएमने युतीच्या बालेकिल्ल्यात चांगली मते मिळविल्याचे दिसते आहे.
भाजपच्या गडातच घेतली मते
हिंदूबहुल भागातील ३० तर ६ संमिश्र भागातील मतदान केंद्रावर सुमारे २३३५ मते एमआयएमला गेल्याचे निवडणूक विभागाच्या केंद्रनिहाय तक्त्यात दिसत आहे. एमआयएमने भाजपच्या गडातून मते घेतल्यामुळे आ. सावे यांचे मताधिक्य घटले.
केंद्र क्र.......केंद्राचे नाव.. सावेंना मतदान.. इम्तियाजना मतदान
१७५......स्वामी विवेकानंद विद्या मंदिर..........४५९..........४४
१७६.....स्वामी विवेकानंद विद्या मंदिर.........५०५...........४१
१७७.....स्वामी विवेकानंद विद्या मंदिर......४५७..........२७
१७८....स्वामी विवेकानंद विद्या मंदिर.......५४०..........४५
१७९....किड्स झोन इंग्लिश स्कूल......५२३...............७२
१८०.......किड्स झोन इंग्लिश स्कूल......५२९.........२३
१८१.....किड्स झोन इंग्लिश स्कूल.......३६४.........३०
१८२.....सुधाकरराव नाईक हायस्कूल.......६९१......४७
१८३....सुधाकरराव नाईक हायस्कूल.........६१५......४६
१८४.....सुधाकरराव नाईक हायस्कूल.........५३३........६१
१८५.....सुधाकरराव नाईक हायस्कूल.........६५३.........३७
१८६.....सुधाकरराव नाईक हायस्कूल........६७५......४९
१८७.........कै. रामचंद्र नाईक हायस्कूल.......४२२.......३५
१८८......कै. रामचंद्र नाईक हायस्कूल.........५३५.........२१
१८९.......सुधाकरराव नाईक हायस्कूल......४०७.......६४
१९०......सुधाकरराव नाईक हायस्कूल........५९६........५६
१९१.....पं.जवाहरलाल नेहरू कॉलेज.....३००.........१९९
१९२.....पं.जवाहरलाल नेहरू कॉलेज......३४८.........१७४
१९३.....पं.जवाहरलाल नेहरू कॉलेज.......४२७.........२१३
१९४.....सुधाकरराव नाईक हायस्कूल.......३८२........५४
१९५........सुधाकरराव नाईक हायस्कूल.......४०२.......६९
१९६.......सुधाकरराव नाईक हायस्कूल........३००........५५
१९७....पं.जवाहरलाल नेहरू कॉलेज.........३५१.......२११
१९८.......पं.जवाहरलाल नेहरू कॉलेज.......४३२......१६७
१९९......सुधाकरराव नाईक हायस्कूल......४४२........११६
२००......पं.जवाहरलाल नेहरू कॉलेज.......३७२.......१२९
२५९.....संत मीरा हायस्कूल .....५८३............४०
२६०.....संत मीरा हायस्कूल .........५१७...........२८
२६१...संत मीरा हायस्कूल .........५१४..........१६
२६८.......एमआयटी हायस्कूल .......४१०.......१८
२८२.....किलबिल बालक मंदिर........५५६.........१३
२८३....किलबिल बालक मंदिर.......३३७...........२६
२८४....किलबिल बालक मंदिर......३७०......२४
२८५....संत मीरा हायस्कूल ......५१४.........४१
२८६......एमआयटी हायस्कूल ....२९३.........१९
२८७......एमआयटी हायस्कूल .....३६६.......२५
एकूण ३६ केंद्र.......१६७२०.....२३३५