सिरसमार्ग, लोखंडी सावरगावात मतदान
By Admin | Published: August 25, 2016 12:37 AM2016-08-25T00:37:11+5:302016-08-25T01:02:56+5:30
सिरसमार्ग / लोखंडी सावरगाव : गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग व अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
सिरसमार्ग / लोखंडी सावरगाव : गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग व अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
सिरसमार्ग ग्रामपंचायतीत ११ जागासाठी ४ पॅनल निवडणूक रिंगणात होते. चार मतदान केंद्रांवर ३०४१ पैकी २५७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकारी म्हणून एस. एम. पुरी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून के. जी. सोमाणी यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता.
लोखंडी सावरगाव येथे देखील ११ जागांसाठी चार मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडली. ३६ उमेदवार रिंगणात होते. २३८१ मतदारांपैकी २०६० मतदारांनी मतदान केले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सिरसमार्ग व लोखंडी सावरगाव या दोन्ही ग्रा.पं.च्या निवडणूक निकालांकडे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी फैसला
सिरसमार्ग, लोखंडी सावरगाव येथील ग्रा. पं. निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी अनुक्रमे गेवराई व अंबाजोगाई तहसील कार्यालयात पार पडणार आहे. चौसाळ्यात एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीही त्याच दिवशी बीड तहसील कार्यालयात होईल. (वार्ताहर)