नवीन वर्षात वडगावचा पाणीप्रश्न सुटणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:31 PM2018-12-31T21:31:29+5:302018-12-31T21:31:43+5:30
डगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचा विषय कायमच वादात अडकला आहे. अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले आहेत. अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही.
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचा विषय कायमच वादात अडकला आहे. अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले आहेत. अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आजही वडगावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता नवीन वर्षात तरी गावाचा पाणीप्रश्न सुटणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वडगावमध्ये अनेक वर्षापासून गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने जवळपास ४ कोटी रुपये खर्च करुन पेयजल योजना राबविली. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही योजनाच कुचकामी ठरली. ही योजना फसल्यानंतर ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडून पाणी विकत घेण्याचा निर्णय घेवून एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभ पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोग निधीतून १ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मुख्य जलवाहिनीचे कामही करण्यात आले.
पण छत्रपतीनगर, फुलेनगर, सलामपुरेनगर भागात अंतर्गत पाईपलाईन अभावी पाणी पोहचत नसल्याने ग्रामपंचयतीने मूळ गावासह या भागात अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. १ कोटी ४० लाख रुपयांमधून जवळपास २० किलोमीटर पाईपलाईनचे काम मार्च २०१८ मध्ये ग्रामपंचायतीने पटेल कन्स्ट्रक्शन या एजन्सीला दिले. पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले. मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. मध्यंतरी कंपनीने पाईप आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यास ग्रामपंचायतीने नकार दिला. विशेष म्हणजे कामात भागीदारी द्यायला कंपनी तयार नसल्याने एका पदाधिकाºयाने या कामात खोडा घातला होता. पण कंपनी पुन्हा तयार झाल्यानंतर पाईप आणायचे कोणी यावरुन एकमत होत नसल्याने हे काम तसेच रखडले गेले. काही दिवसांपूर्वी कमासाठी आणलेल्या जुन्या पाईपवरुन वादळ उठले होते. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी व बिडकीन पोलिसांनी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाºयांची चौकशीही केली होती. तरीही पाईपलाईनचे कामाला सुरुवात झाली नाही. ग्रामपंचायत व कंपनीच्या वादात पाईपलाईनचे काम रखडल्याने लगतच्या परिसरात पायपीट करुन डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. या प्रकरणी सरपंच उषा एकनाथ साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामासंदर्भात वारंवार संपर्क करुनही ठेकेदार प्रतिसाद देत नाही. ८ दिवसांत काम सुरु केले नाही तर सदरील कामाचे टेंडर रद्द करुन पुन्हा नव्याने टेंडर काढले जाईल, असे त्यांनी सांगितले.
नविन वर्षात तरी पाणीप्रश्न सुटणार ?
पाण्यासाठी छत्रपती नगरातील महिलांनी दोनवेळा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे. यावेळी ग्रामपंचायतीने सुुरुवातील ३ दिवसांत काम सुरु करु तर दुसºयांदा १ नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात केली जाईल असे महिलांना आश्वासन दिले होते. याला दोन महिने झाले तरी अजून काम सुरु होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे येणाºया नवीन वर्षात तरी पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.